लंडन, 07 जुलै : भारताचा दिग्गज खेळाडू, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आज 38व्या वर्षात पदार्पण करत आहे. सध्या भारतीय संघ ICC Cricket World Cupमध्ये फायनल गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघानं आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. त्यामुळं धोनीला संघानं एक छान असे बर्थ गिफ्ट दिले आहे. सामन्यानंतर केक कापत भारतीय संघानं धोनीचा वाढदिवस साजरा केला. मात्र ऋषभ पंत आणि मुलगी झिवा यांच्यासोबर धोनीनं केला डान्स सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
धोनीच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी डान्स केला. तर, झिवानं आपल्या बाबांना थिरकायला लावले. साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेविरोधात विजय मिळवत धोनीनं आपली पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि भारतीय संघातील खेळाडू यांनी आपला वाढदिवस साजरा केला. साक्षीनं आपल्या इन्स्टाग्रामवरून धोनीच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. यात धोनी चक्क तीन केक कापताना दिसत आहे.
त्याचबरोबर हार्दिक पांड्यानं धोनीसोबत हॅलिकॉप्टर शॉट मारण्याचाही सराव केला. तर ऋषभ पंतसोबत स्पेशल डान्स केला.
Retweet maximum if you love this dad daughter duo
— TEAM MS DHONI #Dhoni (@imDhoni_fc) July 7, 2019
Mahi & ziva.❤️❤️#HappyBirthdayDhoni pic.twitter.com/2dvoINIOb8
भारतीय संघानं बांगलादेशला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा सेमीफायनलचा सामना न्यूझीलंड विरोधात मंगळवारी होणार आहे. हा सामना नॉक आऊट असल्यामुळं भारतीय संघाला आपली सर्वोच्च खेळी करावी लागणार आहे.
वाचा- World Cup : राहुल-रोहितची विक्रमी भागिदारी, दिग्गजांना टाकलं मागे
वाचा- रोहितची 64 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, 8 देशही करू शकले नाही 'ही' कामगिरी
वाचा- World Cup मध्ये रोहितच हिट! पाहा कोण आहेत टॉप 5 फलंदाज
VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!