Happy Birthday Lasith Malinga : फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या यॉर्कर किंगनं क्रिकेटसाठी सोडले होते घर!

Happy Birthday Lasith Malinga : फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या यॉर्कर किंगनं क्रिकेटसाठी सोडले होते घर!

श्रीलंकेचा माजी गोलंदाजा लसिथ मलिंगानं वर्ल्ड कप 2019नंतर निवृत्ती जाहीर केली.

  • Share this:

कोलंबो, 28 ऑगस्ट : श्रीलंकेचा माजी गोलंदाजा लसिथ मलिंगानं वर्ल्ड कप 2019नंतर निवृत्ती जाहीर केली. दरम्यान आज मलिंगाचा 36वा वाढदिवस आहे. मलिंगाचा जन्म 28 ऑगस्ट 1983मध्ये गाले येथील एका छोट्याशा गावात झाला. मलिंगाचे बाबा बस दुरुस्ती कामगार होते. मलिंगानं खुप मेहनत कप श्रीलंकेच्या क्रिकेट संघात आपली जागा बनवली. मलिंगानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड केले. मलिंगानं एकूण 536 विकेट घेतल्या आहेत. यात 30 कसोटी सामन्यात 101, 226 एकदिवसीय सामन्यात 338 आणि 73 टी-20 सामन्यात 97 विकेट घेतल्या आहेत. 17व्या वर्षात मलिंगानं प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मलिंगाचे रेकॉर्ड सगळ्यांना माहित आहे पण खुप कमी लोकांना त्यांचा कुटुंबाबद्दल माहित आहे. श्रीलंकेमधील गाले येथील रथगामा कस्बे येथे मलिंगाचे मुळ घर आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, अगदी सामन्या माणसासारखे मलिंगाचे घर आहे. एवढेच नाही तर त्याचे आई-बाबा अजूनही शिलाईचे काम करतात. एका वृत्तपत्राशी बोलताना मलिंगाच्या आईनं, "घरातील एक कोपऱ्यात मलिंगाची आठवण आली की पाहण्यासाठी आम्ही एक फोटो लावला आहे. क्रिकेट खेळण्यात व्यस्त असल्यामुळं तो जवळजवळ 10 वर्ष घरी आलेला नाही. मी त्याचे सामने पाहायला जाते. आता निवृत्तीनंतर तो घरी येईल", असे सांगितले. वर्ल्ड कपमध्ये अखेरचा सामना खेळत मलिंगानं निवृत्ती जाहीर केली.

वाचा-Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

निवृत्तीनंतर दुसऱ्या देशात स्थायिक होणार मलिंगा

श्रीलंकेला 2014 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड टी 20 चॅम्पियन करणारा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा लवकरच देश सोडू शकतो. लसिथ मलिंगाला ऑस्ट्रेलियात परमनंट रेसिडेंसी मिळाली असून तो कुटुंबासोबत तिथे रहायला जाण्याची शक्यता आहे. मलिंगाचे वय 35 असून तो प्रशिक्षक म्हणून यापुढे क्रिकेटमध्ये राहणार असल्याचं समजतं. ऑस्ट्रेलियात कोणत्याही संघाचा तो प्रशिक्षक होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.मलिंगाने याआधी 2018 मध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 मध्ये तो खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता.

वाचा-सचिन विरोधातलं ट्वीट ICCला पडलं महागात, जगभरातील नेटीझन्सनं काढली इज्जत!

वर्ल्ड कपमध्ये केली चांगली खेळी

यॉर्कर किंग लसिथ मलिंगानं वर्ल्ड कप 2019मध्ये चांगली गोलंदाजी केली. मात्र श्रीलंका संघाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करता आले नाही. लीग स्टेजमध्ये बाहेर पडल्यानंतरच मलिंगानं निवृत्ती जाहीर केली.

वाचा-क्रिकेट संघाच्या कर्णधारासह खेळाडू बेपत्ता, जाहीरात देऊन शोध सुरू

VIDEO : 'त्या' हॉटेलमध्ये ठरलं होतं, उद्धव ठाकरेंनी करून दिली भाजपला आठवण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading