सचिनच्या मित्राचा आज वाढदिवस; नावावर आहे गोलंदाजीमधील हा विक्रम!

सचिनच्या मित्राचा आज वाढदिवस; नावावर आहे गोलंदाजीमधील हा विक्रम!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी त्याचा सर्वात चांगला मित्राला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी त्याचा सर्वात चांगला मित्राला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनचा हा मित्र म्हणजे अन्य दुसरा कोणी नसून भारताचा माजी जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ हा आहे. भारताच्या या माजी गोलंदाजाचा आज 50वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रीनाथला केवळ सचिनने नव्हे तर अन्य क्रिकेटपटूंनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताकडून खेळताना श्रीनाथने 315 विकेट घेतल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने श्रीनाथसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. एक तगडा स्पर्धक, एक चांगला मित्र आणि एक शानदार गोलंदाज ज्याच्या सोबत मी अनेक वर्ष क्रिकेट खेळला. श्रीनाथ वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, अशी पोस्ट सचिनने शेअर केली आहे. क्रिकेट डॉट.कॉम.एयू एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 1991 मधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याचा आहे. यात श्रीनाथने एका फलंदाजाला चकवा देत बोल्ड केले. त्यानंतर संघातील अन्य खेळाडू संजय मांजरेकर, मोहम्मद अझहरुद्दीन आणि श्रीकांत यांनी त्याला शुभेच्छा देत आहेत.

म्हैसूर एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीनाथने भारताकडून 67 कसोटी तर 229 वनडे खेळल्या आहेत. वनडेत श्रीनाथ यांनी 315 विकेट तर कसोटीत 236 विकेट घेतल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सध्या श्रीनाथ रेफरी म्हणून काम करत आहे. भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जलद गोलंदाज हा विक्रम श्रीनाथच्या नावावर आहे. त्यानंतर अजित आगरकर (288 विकेट) आणि जहीर खान (269 विकेट) यांचा क्रमांक लागतो.

बीसीसीआयने दिल्या शुभेच्छा

क्षणात होत्याचं नव्हतं झालं, धुळे केमिकल कंपनीतील स्फोटाचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 09:27 PM IST

ताज्या बातम्या