नवी दिल्ली, 1 जून: भारतीय विकेटकीपर (Wicket keeper), बॅट्समन (Batsman) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) माजी कॅप्टन दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) 1 जून रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमधील एक अनुभवी बॅट्समन असलेल्या दिनेश कार्तिकनं 2004 मध्ये भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) पदार्पण केलं होतं. 2007 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T-20 World Cup) स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना जिंकलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या (Mahindra Singh Dhoni) नेतृत्वाखालील संघात दिनेश कार्तिकचा समावेश होता. तसंच 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्या संघातही तो होता.
महेंद्रसिंग धोनीच्या आधी तीन महिने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणारा दिनेश कार्तिक संघातून सतत आत आणि बाहेर होत राहिला. भारतीय संघातील अनेक खेळाडूंसोबत खेळण्याची संधी त्याला मिळाली. अशा परिस्थितीत कार्तिकचे ‘हिटमॅन’ रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेत (South Africa) 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान रोहित शर्माच्या कारकीर्दीला वेगळं वळण देणाऱ्या सामन्यात कार्तिकची महत्त्वाची भूमिका होती. या सामन्यात आफ्रिकेविरूद्ध रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. आणि हे शतक त्यानं दिनेश कार्तिकच्या बॅटनं केलं होतं.
2007 मधील आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील त्या सामन्यात रोहित शर्मानं 40 बॉल्समध्ये नाबाद 50 रन्स करून सामना जिंकून दिला होता. रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकामुळे भारतानं हा सामना 37 धावांनी जिंकला. रोहित शर्माला त्याच्या शानदार खेळीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आलं होतं.
2⃣0⃣0⃣7⃣ ICC World T20-winner 🏆 2⃣0⃣1⃣3⃣ ICC Champions Trophy-winner 🏆 1⃣5⃣2⃣ intl. games & 3⃣1⃣7⃣6⃣ intl. runs 👍
Here's wishing wicketkeeper-batsman @DineshKarthik a very happy birthday. 🎂 👏#TeamIndia pic.twitter.com/aS23y3TnV7 — BCCI (@BCCI) June 1, 2021
ICC Meeting Today: भारत राखणार T20 वर्ल्ड कपचं यजमानपद? BCCI समोर मोठं आव्हान
गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या शोमध्ये दिनेश कार्तिकनं याचा खुलासा केला होता. रोहित शर्मानं डर्बनमधील किंग्जमीडवर ज्या बॅटनं पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावलं ती बॅट माझी होती आणि मला त्याचा अभिमान आहे, असं दिनेशनं सांगितलं होतं. ‘मी त्याच बॅटनं खेळलो होतो पण मला काही चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळं रोहितशी बोलताना काय बेकार बॅट आहे, असं मी म्हटलं. त्यावर त्यानं मला ही बॅट द्या, असं म्हणून ती बॅट घेतली आणि दमदार खेळी केली. अर्थातच हे माझ्या बॅटचं श्रेय नाही, हे सर्वस्वी रोहितचं श्रेय आहे. पण मला त्या सर्व गोष्टी आठवतात आणि त्या माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत,’ असंही दिनेशनं म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma