Home /News /sport /

न्यूझीलंडला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा बनला दिवाळखोर, जगतोय हलाखीचं आयुष्य

न्यूझीलंडला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा बनला दिवाळखोर, जगतोय हलाखीचं आयुष्य

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. आयसीसीच्या स्पर्धेत या दोन्ही टीम दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहेत.

    मुंबई, 13 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. आयसीसीच्या स्पर्धेत या दोन्ही टीम दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहेत. याआधी 2000 साली या दोन्ही टीममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल (ICC Champions Trophy) झाली होती. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. ऑलराऊंडर क्रिस केर्न्स (Chris Cairns) न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने या सामन्यात शतकी खेळी केली. याच क्रिस केर्न्स याचा आज 51 वा वाढदिवस आहे. 1970 साली न्यूझीलंडच्या पिक्टनमध्ये जन्मलेल्या क्रिस केर्न्सने 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. न्यूझीलंडचा हा ऑलराऊंडर अनेकवेळा वादातही सापडला. क्रिस केर्न्सवर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले. आता त्याची परिस्थिती हलाकीची आहे, अत्यंत गरिबीमध्ये तो आयुष्य जगत आहे. केर्न्सने 1989 साली जॉन राईट (John Wright) कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ टेस्टमधून पदार्पण केलं होतं. पहिल्या टेस्टमध्ये त्याला खास कामगिरी करता आली नाही, पण त्याने आपल्या वेगवान बॉलिंगने ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना चकवलं. केर्न्सने न्यूझीलंडसाठी 62 टेस्टमध्ये 3,320 रन केले आणि 218 विकेटही घेतल्या. टेस्टमध्ये त्याला 13 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि एकदा मॅचमध्ये 10 विकेट मिळाल्या. केर्न्सने 218 वनडेमध्ये 4,950 रन केले आणि 201 विकेट घेतल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 शतकं आणि 48 अर्धशतकं आहेत. प्रथम श्रेणीी आणि लिस्ट ए या दोन्हींमध्ये त्याने 10 हजार रन केले, तसंच 1100 पेक्षा जास्त विकेटही घेतल्या. भारताचा विजयाचा घास हिरावला केर्न्सने भारताविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अविस्मरणीय खेळी केली. या सामन्यात भारताकडून सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) 117 रन आणि सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 69 रनची खेळी केली, त्यामुळे भारताने 264 रन केले. केर्न्सने शानदार बॉलिंग करत 10 ओव्हरमध्ये 2 मेडन टाकून 40 रन दिले, त्याला एकही विकेट मिळाली नाही. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. वेंकटेश प्रसादने दुसऱ्याच ओव्हरमध्ये ओपनर क्रेग स्पेयरमनला आऊट केलं. किवी टीमच्या 4 विकेट 109 रनवर गेल्या होत्या, त्यामुळे भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल, असं वाटत होतं, पण केर्न्सने 113 बॉलमध्ये नाबाद 102 रन केले. केर्न्सचा जगण्यासाठी संघर्ष 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर केर्न्स 2006 साली निवृत्त झाला. यानंतर त्याने इंडियन क्रिकेट लीग (ICL) मध्ये भाग घेतला. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू लू विन्सेंट मॅच फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळला, तेव्हा त्याने केर्न्सवर फिक्सिंगची ऑफर दिल्याचा आरोप केला. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅण्डन मॅक्कलमनेही केर्न्सवर अशाच प्रकारचे आरोप केले, पण हे आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केर्न्सने 2010 साली दुबईमध्ये हिऱ्यांचा व्यापार सुरू केला. 2013 साली त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागले, त्यानंतर त्याचे पैसे जप्त करण्यात आले, त्यामुळे केर्न्सची आर्थिक परिस्थिती खराब झाली. त्याच्यावर लंडनमध्ये खटलाही चालवण्यात आला. घर चालवण्यासाठी केर्न्सने ऑकलंडमध्ये बस धुण्याची कामंही केली. एवढच नाही तर त्याने ऑकलंड नगरपालिकेसाठी ट्रक चालवला आणि बारमध्येही काम केलं. एकेकाळचा हा दिग्गज खेळाडू आज गुमनामी आयुष्य जगत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: New zealand, Team india

    पुढील बातम्या