Happy Birthday Anil Kumble : एका अपूर्ण शतकासाठी सेहवागला आजही मागावी लागते कुंबळेची माफी

Happy Birthday Anil Kumble : एका अपूर्ण शतकासाठी सेहवागला आजही मागावी लागते कुंबळेची माफी

अनिल कुंबळेचा आज 49वा वाढदिवस आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेटमध्ये एक दशक आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांची झोप उडवली. या गोलंदाज आहे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे. अनिल कुंबळेचा आज 49वा वाढदिवस आहे. 17 ऑक्टोबर 1970मध्ये कर्नाटकात जन्म झालेल्या हा खेळाडू क्रिकेट विश्वात जम्बो या नावानं ओळखला जातो. क्रिकेटमध्ये आजही कुंबळेच्या नावावर असे रेकॉर्ड आहेत जे कोणताही गोलंदाज तोडू शकलेला नाही.

कुंबळेनं आपल्या गोलंदाजीनं अनेकवेळा भारताला सामने जिंकून दिले आहे. मात्र आपल्या फलंदाजीनंही त्याने कमी कमाल केलेली नाही. कुंबळेनं 2007मध्ये इंग्लंड विरोधात नवव्या स्थानावर फलंदाजी करून शतकी खेळी केली होती. कुंबळेनं कसोटी सामन्यात 110 धावा केल्या होत्या, आणि या मालिकेतील सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरोधात 2007-08मध्ये कुंबळेकडे दुसरे शतक झळकावण्याची संधी होती. मात्र या सामन्यात कुंबळे 87 धावांवर बाद झाला. कुंबळे बाद होण्याचे कारण होते, भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 2007-08मध्ये नवव्या स्थानी कुंबळे फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत इशांत शर्मा खेळत होता. या सामन्यात चहापानादरम्यान कुंबळे 87 धावांवर खेळत होता. दरम्यान, चहापानाच्या वेळेला मैदानाबाहेर गेलेल्या कुंबळेला सेहवागनं षटकार आणि चौकार मारण्याचा अजब सल्ला दिला. त्यानंतर मैदानावर फलंदाजीसाठी जाताच पहिल्याच चेंडुवर कुंबळे बाद झाला. त्यामुळं 13 धावांनी त्याचे शतक हुकले. यासाठी आजही सेहवाग कुंबळेची माफी मागतो.

नुकतेच सेहवागनं ट्विटरवर कुंबळेचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, “कसोटी क्रिकेटमध्ये माझ्यामुळं तुझं दुसरं शतक राहिलं, त्यासाठी मला माफ कर, तुला आता तुझ्या शतकासाठी फक्त 51ची गरज आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे मिश्किल ट्वीट केले.

कुंबळेनं 132 कसोटी सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 271 सामन्यात 337 विकेट घेतल्या आहेत. कुंबळेनं आपल्या 117व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करण्याचा अनोखा विक्रम केला होता. कुंबळेनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सात शतक लगावले आहेत. तर, पर्थमध्ये 2008मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळेनं 600 विकेट पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा कुंबळे तिसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. 2008मध्ये दिल्लीमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळत कुंबळेनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 01:16 PM IST

ताज्या बातम्या