Home /News /sport /

IND vs ENG : Cheteshwar Pujara चं टीम इंडियात कमबॅक, या खेळाडूचं स्थान धोक्यात!

IND vs ENG : Cheteshwar Pujara चं टीम इंडियात कमबॅक, या खेळाडूचं स्थान धोक्यात!

टीम इंडिया मागच्या वर्षी न झालेली सीरिजची पाचवी टेस्ट खेळण्यासाठी इंग्लंडला (India vs England) जाणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) टीममध्ये कमबॅक झालं आहे.

    मुंबई, 3 जून : टीम इंडिया मागच्या वर्षी न झालेली सीरिजची पाचवी टेस्ट खेळण्यासाठी इंग्लंडला (India vs England) जाणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) टीममध्ये कमबॅक झालं आहे. 1 जुलैपासून बर्मिंघममध्ये या पाचव्या टेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे. पुजाराचं टीम इंडियात पुनरागमन झाल्यामुळे हनुमा विहारीचं (Hanuma Vihari) टीममधलं स्थान गोत्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या खराब कामगिरीनंतर पुजाराला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला, यानंतर हनुमा विहारीला पुजाराच्या तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली. पुजाराने इंग्लंडमध्ये ससेक्स काऊंटीकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली, त्यामुळे त्याची इंग्लंड दौऱ्यातल्या 17 सदस्यीय भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. पुजारा टीममध्ये आल्यामुळे विहारीला टीममध्ये स्थान मिळणार का? तसंच मिळालं तर तो कोणत्या क्रमांकावर खेळणार? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगला तयार आपण टीममध्ये कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगला तयार आहोत, बॅटिंग क्रमांकाविषयी मला कोणतीही चिंता नाही, असं हनुमा विहारी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाला. 2020-21 साली सिडनी टेस्टदरम्यान विहारीने त्याच्या बॅटिंगने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्या इनिंगमध्ये विहारीने 23 रनच केले पण मॅचच्या हिशोबाने ही इनिंग अत्यंत महत्त्वाची होती. हॅमस्ट्रिंग दुखापतीनंतरही विहारीने 160 बॉल खेळले, ज्यामुळे भारताने मॅच ड्रॉ केली. विहारीच्या या खेळीचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england

    पुढील बातम्या