विहारीनं केली सचिनसारखी अनोखी कामगिरी, 29 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं झालं!

हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या डावात शतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 02:53 PM IST

विहारीनं केली सचिनसारखी अनोखी कामगिरी, 29 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं झालं!

जमैका, 02 सप्टेंबर : भारतानं दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडिजसमोर 468 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारताचा हनुमा विहारी आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या डावात नाबाद 111 धावांची भागिदारी केली. याच्या जोरावर भारतानं कसोटीत मजबूत पकड मिळवली आहे. विंडीजनं तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 45 धावा केल्या आहेत. हनुमा विहारीनं दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक केलं. या खेळीसह त्यानं सचिन तेंडुलकरने 29 वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली.

हनुमा विहारीनं दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करत सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत स्थान पटकावलं. त्यानं पहिल्या डावात 111 तर दुसऱ्या डावात नाबाद 53 धावा केल्या होत्या. एका कसोटीतील दोन डावात शतक आणि अर्धशतक यासह आशियाबाहेर सहाव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत त्यानं स्थान मिळवलं.

याआधी पॉली उम्रीगर (1962), मन्सूर अली खान पतौडी (1967), एमएल जयसिंहा (1968)आणि सचिन तेंडुलकर (1990)यांनी अशी कामगिरी केली होती. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात हनुमा विहारी पहिल्या क्रमांकावर आहे.

हनुमा विहारीनं दोन सामन्यात चार डावामंध्ये 96.33 च्या सरासरीनं 289 धावा केल्या आहेत. या कसोटी मालिकेत त्यानं एक शतक आणि दोन अर्धशतकं केली आहेत. 32, 93, 11 आणि 53 धावांची खेळी केली. पहिल्या कसोटीत भारतानं 318 धावांनी विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली आहे.

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 02:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...