T20 Blast : धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!

T20 Blast : धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!

नुकत्याच झालेल्या टी-20 ब्लास्टमधील एका सामन्यात धोनीच्या चतुराईलाही मागे टाकेल असा प्रकार घडला.

  • Share this:

लंडन, 28 जुलै : क्रिकेट हा असा खेळा आहे जिथे फलंदाज कसाही बाद होऊ शकतो. यात गोलंदाजीच्या शैलीबरोबरच विकेचकीपरची चतुराईही तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळं क्रिकेट या खेळात किपरला खुप महत्त्वाचे आहे. दरम्यान क्रिकेट आणि किपर यांचा उल्लेख केला की पहिलं नाव येतं ते भारताचा दिग्गच किपर महेंद्रसिंग धोनीचे. धोनीने नेहमीच आपल्या नव्या पद्धती रुजवल्या आणि फलंदाजानं बाद केले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या टी-20 ब्लास्टमधील एका सामन्यात धोनीच्या चतुराईलाही मागे टाकेल असा प्रकार घडला.

टी-20 ब्लास्टमध्ये हॅम्पशायर आणि ससेक्स यांच्यात झालेल्या सामन्यात हॅम्पशायर संघाचा यष्टीरक्षक लुईस मॅकमनस याने ससेक्सचा फलंदाज लॉरी इव्हॅन्स याला धोनी-स्टाईल बाद केले. ससेक्स प्रथम फलंदाजी करत असताना, सामन्याच्या 10व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. लेग स्पिनर मसन क्रेनचा चेंडू लेग स्टम्पवर पडला आणि फलंदाजाला चकवा देत किपरच्या हातात हेला. किपरकडे चेंडू जाताच त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला चेंडू पकडण्यात यश आले, पण ही बाब फलंदाजाच्या लक्षात आले नाही. तो क्रीजच्या बाहेर जाऊ लागला, तेवढ्यात मॅकमनसनं चेंडू स्टम्पला लावला आणि त्याला बाद केले.

वाचा-पुन्हा वाद चिघळला, रोहितमुळे विराटनं पत्रकार परिषद घेण्यास दिला नकार!

मॅकमनसनं वापरलेली चतुराई फलंदाजी करत असलेल्या इव्हॅन्सला पटली नाही, त्यामुळं त्यानं नाराजी व्यक्त करत पंचांकडे दाद मागितली, पण पंचांनी नियमानुसार त्याला बाद ठरवले. त्यामुळं मॅकमनसन 15 धावा करत बाद झाला.

वाचा- युवी इज बॅक! सिक्सर किंगनं केली पाक गोलंदाजाची धुलाई

त्यानंतर ससेक्सकडून फिलिप सॉल्टनं 46 चेंडूत 73 धावा केल्या तर डेव्हिड वाईजनं नाबाद 42 धावांची खेळी केली. या जोरावर त्यांनी 8 विकेट गमावत 188 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हॅम्पशायरचा संघ 174 धावांवर बाद झाला.

वाचा- धवननं घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चाहते विचारतात कधी करणार पक्षप्रवेश!

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनीसोबत डान्स, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: July 28, 2019, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading