मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI ने भारताची लाज काढली! खेळपट्टी सुकवण्यासाठी केला चक्क हेअर ड्रायर अन् इस्त्रीचा वापर

BCCI ने भारताची लाज काढली! खेळपट्टी सुकवण्यासाठी केला चक्क हेअर ड्रायर अन् इस्त्रीचा वापर

भारत श्रीलंका यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर खेळपट्टी सुकवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे बीसीसीआयची खिल्ली उडवली जात आहे.

  • Published by:  Suraj Yadav

गुवाहटी, 06 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला. खेळपट्टी ओलसर असल्यानं पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता पुढचा सामना 7 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सामना सुरू होण्याआधीच पावसाने हजेरी लावली. काही काळ वाट पाहिल्यानंतर पाऊस थांबला. खेळपट्टीची पाहणी कऱण्यात आल्यानंतर ओलसरपणा असल्यानं सामना रद्द करण्यात आल्याचं पंचांनी जाहीर केलं.

पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर स्टेडियममध्ये खेळपट्टी सुकवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयची खिल्ली उडवली जात आहे. चाहत्यांनी म्हटलं की, सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडं मैदान झाकण्यासाठी चांगले कव्हर नाहीत.

सामना रद्द झाल्याने अनेक माजी क्रिकेटपटूसुद्धा नाराज झाले. व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलं की, इतका कमी पाऊस पडल्यानंतर सामना रद्द होणं दुर्दैवी आहे. मैदान तयार कऱणाऱ्यांनी सज्ज असायला पाहिजे होतं.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेसुद्धा ग्राउंड स्टाफची चूक असल्याचं म्हटलं.

गुवाहटीतील बारसपारा स्टेडियममधील हा फक्त तिसरा सामना होता आणि तोसुद्धा रद्द झाला.

भारत-श्रीलंका सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती पण पावसामुळे सामना रद्द करावा लागल्याने प्रेक्षक नाराज झाले.

पावसाने खेळाडूंचा केला हिरमोड पण प्रेक्षकांनी केले नाही निराश, पाहा VIDEO

First published:

Tags: BCCI