S M L

मशिदीत गोळीबार : न्यूझीलंड vs बांगलादेश तिसरी कसोटी रद्द

न्यूझीलंडमधील गोळीबारात २७ नागरिक ठार, बांगलादेशचे खेळाडू थोडक्यात बचावले.

Updated On: Mar 15, 2019 10:46 AM IST

मशिदीत गोळीबार : न्यूझीलंड vs बांगलादेश तिसरी कसोटी रद्द

वेलिंग्टन, 15 मार्च : न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च इथं झालेल्या गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्या मशिदींवर गोळीबार झाला त्यातील एका मशिदीत न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश संघाचे खेळाडू होते. त्यांनी वेळीच मशिदीतून ओव्हल मैदानाकडे धाव घेत जीव वाचवला.

दरम्यान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱा तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. उद्या 16 मार्चला ओव्हलवर तिसरी कसोटी खेळण्यात येणार होती. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिळून हा निर्णय घेतला आहे.

गोळीबार होत असल्याचे समजताच अल नूर मशिदीतून बांगलादेशचे क्रिकेटपटू सुरक्षितपणे बाहेर पडले. तिथून सर्व खेळाडू हॉटेलवर पोहचले.


हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाला असून हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी म्हटले आहे.



Loading...

VIDEO : न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार, जीव मुठीत घेऊन धावले बांगलादेशचे क्रिकेटर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: newzealand
First Published: Mar 15, 2019 10:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close