सचिनने ट्विटरवर केलं होतं आवाहन, 19 वर्षांनी ज्या वेटरला शोधत होता तो सापडला

सचिनने ट्विटरवर केलं होतं आवाहन, 19 वर्षांनी ज्या वेटरला शोधत होता तो सापडला

19 वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये वेटरसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख सचिनने केला होता. त्या वेटरला शोधण्यासाठी सचिनने लोकांची मदत मागितली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी चेन्नईतील एका हॉटेलमध्ये वेटरसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख सचिनने केला होता. त्या वेटरला शोधण्यासाठी सचिनने लोकांची मदत मागितली होती. वेटरशी झालेल्या भेटीत एक सल्ला सचिनला मिळाला होता. त्यानंतर फलंदाजीच्या शैलीत झाला होता.

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे की, एका कसोटी मालिकेवेळी चेन्नईतील ताज कोरोमंडल हॉटेलमधील एक वेटर भेटला होता. त्यावेळी आर्म गार्डबद्दल त्याच्याशी चर्चा झाली होती. त्यात वेटरनं आर्म गार्डचं डिझाईन बदलण्याचा सल्ला दिला होता. सोशल मीडिया युजर्स तुम्ही त्याला शोधण्यासाठी माझी मदत करू शकता का? असंही सचिनने विचारलं होतं.

काही वर्षांपूर्वी एका मालिकेसाठी चेन्नईतील हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. तेव्हा एक वेटर माझ्यासाठी कॉफी घेऊन रूममध्ये आला. तो म्हणाला की, जर तुमची परवानगी असेल तर क्रिकेटबद्दल तुमच्याशी काही बोलायचं होतं. मी बोल म्हटल्यावर त्यानं सांगितलं की, तुम्ही आर्म गार्ड घालून खेळता तेव्हा बॅट स्विंग होण्याची शैली वेगळी असते.

सचिन पुढे म्हणाला की, वेटरनं सांगितलेली गोष्ट मलाही माहिती होती पण ती कोणालाही बोललो नव्हतो. त्या वेटरला सांगितलं की, तुच एकटा आहेस ज्यानं माझी बॅटिंग इतकी बारकाईने पाहिलीस. त्यानंतर आर्म गार्डला रिडिझाइन केलं.

व्हिडिओ आणि ट्विट करून सोशल मीडियावर केलेल्या सचिनच्या आवाहनानंतर न्यूज 18 ने त्या वेटरला शोधलं आहे. गुरु प्रसाद असं चेन्नईत राहणाऱ्या त्या वेटरचं नाव आहे. 19 वर्षांपूर्वी सचिनला तो भेटला होता.

आर्म गार्डच्या रिडिझाइनबद्दल सल्ला दिला होता आणि सचिननेही त्यानंतर आर्म गार्ड रिडिझाईन केले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत सचिनची खेळण्याच्या शैलीत थोडा बदल झाला होता.

Published by: Suraj Yadav
First published: December 16, 2019, 8:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading