प्रो कबड्डी लीगमध्ये गुजरात जायंट्सचा दबदबा कायम

गुजरात जायंट्सने पुणेरी पल्टनचा 35-21 असा सहज पराभव करत आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे. या मॅचमध्ये आपल्या तगड्या डिफेन्सच्या जोरावर गुजरात जायन्ट्सने पुणेरी पलटनला नमवले

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2017 12:26 PM IST

प्रो कबड्डी लीगमध्ये गुजरात जायंट्सचा दबदबा कायम

23 ऑगस्ट: प्रो-कबड्डी लीगमध्ये गुजरात जायंट्सनी आपला दबदबा कायम ठेवलाय. मंगळवारी गुजरात जायंट्सनी सलग सहाव्या विजयाची नोंद केली.

गुजरात जायंट्सने पुणेरी पल्टनचा 35-21 असा सहज पराभव करत आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे. या मॅचमध्ये आपल्या तगड्या डिफेन्सच्या जोरावर गुजरात जायन्ट्सने पुणेरी पलटनला नमवले. सुरूवातीला गुजरातने 2-0 अशी लीड घेतली. पण नंतर लगेच पुण्याने 2-2 अशी बरोबरी केली. फर्स्ट हाफ संपेपर्यंत स्कोअर 16-7 असा झाला. पण त्यानंतर गुजरातने आपली लीड कायम ठेवली आणि अखेर पुणेरी पल्टनचा पराभव केला. झोन 'ए'मध्ये 41 गुणांसह गुजरात जायंट्स सध्या अव्वल स्थानी आहे.

तर दुसरीकडे युपी योद्धाची पराभवाची मालिका सुरुच आहे. बंगाल वॉरियर्सनं युपीचा 32-31 असा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात बंगालची टीम सरस ठरली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या यूपी योद्धाला अजूनही विजय मिळवता आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...