मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'शेजारी फिनिशर मागायला विसरलात', विजयानंतर गुजरात टाइटन्सने RRला केले ट्रोल

'शेजारी फिनिशर मागायला विसरलात', विजयानंतर गुजरात टाइटन्सने RRला केले ट्रोल

कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Rajasthan Royals vs Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सच्या टीमचा 37 रन्सने पराभव केला. विजयामुळे जोशमध्ये असणाऱ्या या टीमने थेट विरुद्ध खेळलेली टीम राजस्थान रॉयल्सला ट्रोल केले आहे.

मुंबई, 15 एप्रिल: यंदाच्या आयपीएलच्या(IPL 2022) सिझनमध्ये गुजरात टायटन्सची (Rajasthan Royals vs Gujarat Titans) सुरुवात चांगली झाली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम चांगला खेळ करताना दिसतेय. या टीमने आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या टीमचा 37 रन्सने पराभव केला. विजयामुळे जोशमध्ये असणाऱ्या या टीमने थेट विरुद्ध खेळलेली टीम राजस्थान रॉयल्सला ट्रोल केले आहे.

सामना जिंकल्यानंतर गुजरात संघाने राजस्थान रॉयल्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेल्या गुजरात टायटन्सने राजस्थानच्या एका पोस्टवर कमेंट करत शेजारी फिनिशर मागायला विसरलात असा खोचक टोमणा मारला आहे.

गुजरात संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थान फ्रँचायझीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी आम्हाला सध्या आवश्यक असलेल्या गोष्टींची ही यादी आहे. शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रार्थना. सामना संपल्यानंतर राजस्थानच्या या पोस्टवर गुजरातने कमेंट केली.

शेजारी, फिनिशर मागायला विसरलात?! असे गुजरात फ्रँचायझीने म्हटले. दोघांचा हा गंमतशीर संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पोस्टवर चाहत्यांनीही राजस्थान टीमला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रियान पराग टीममध्ये होता, पण त्याने स्वतःची टीम संपवली. असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने गुजरात संघावर निशाणा साधला आहे.

आयपीएल 2022 मधील २४वा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला गेला. या सामन्यात गुजरात संघाने 37 धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा या हंगामातील चौथा विजय होता. दुसरीकडे राजस्थान संघाचा हा हंगामातील तिसरा पराभव होता. गुजरातने या विजयासह गुणतालिकेत थेट अव्वल क्रमांक मिळवला. गुजरातच्या या विजयाचा शिल्पकार हार्दिक पंड्या, पदार्पणवीर यश दयाल आणि लॉकी फर्ग्यूसन ठरले. पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022