• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ...म्हणून गांगुलीला काढून द्रविडला कॅप्टन केलं, चॅपलनी केला गौप्यस्फोट

...म्हणून गांगुलीला काढून द्रविडला कॅप्टन केलं, चॅपलनी केला गौप्यस्फोट

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी टीम इंडियाचा (Team India) प्रशिक्षक असताना घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांबाबत पुन्हा एकदा भाष्यं केलं आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना टीम इंडिया 2007 सालच्या वर्ल्ड कपमधून (World Cup 2007) ग्रुप स्टेजलाच बाहेर झाली होती. तसंच चॅपल प्रशिक्षक असतानाच सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) पहिले कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि मग त्याला टीममधूनही डच्चू देण्यात आला.

 • Share this:
  मुंबई, 21 मे: ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी टीम इंडियाचा (Team India) प्रशिक्षक असताना घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांबाबत पुन्हा एकदा भाष्यं केलं आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना टीम इंडिया 2007 सालच्या वर्ल्ड कपमधून (World Cup 2007) ग्रुप स्टेजलाच बाहेर झाली होती. तसंच चॅपल प्रशिक्षक असतानाच सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) पहिले कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि मग त्याला टीममधूनही डच्चू देण्यात आला. ग्रेग चॅपल टीम इंडियाचे प्रशिक्षक असतानाचा काळ टीम इंडियासाठी सगळ्यात वाईट असल्याचंही अनेक क्रिकेटपटूंकडून सांगण्यात आलं आहे. या सगळ्या वादग्रस्त कारकिर्दीवर ग्रेग चॅपल बोलले आहेत. 'राहुल द्रविडला (Rahul Dravid) भारतीय क्रिकेट टीमला पुढे घेऊन जायचं होतं आणि त्याला भारतीय टीम जगातली सर्वोत्तम टीम करायची होती, पण इतर वरिष्ठ खेळाडू टीममधलं स्वत:चं स्थान वाचवण्यासाठी खेळत होते. जगातली सर्वोत्तम टीम होण्यासाठी द्रविडने भारतीय टीममध्ये खूप गुंतवणूक केली होती, पण टीममधल्या प्रत्येकाची तशी भावना नव्हती. टीममध्ये कायम राहणं, याच गोष्टीवर काहींना लक्ष केंद्रीत केलं होतं. करियरच्या शेवटाकडे आल्यामुळे काहींचा बदल स्वीकारायला विरोध होता,' असे गौप्यस्फोट चॅपल यांनी केले आहेत. 'सौरव गांगुलीला टीममधून डच्चू मिळाल्यामुळे इतरांनाही टीममधलं आपलं स्थान ग्राह्य धरून चालणार नाही, हा संदेश मिळाला. सुरुवातीला या गोष्टीचा टीमसाठी फायदाही झाला, पण गांगुलीचं टीममध्ये पुनरागमन झाल्यानंतर गोष्टी पुन्हा बदलल्या,' अशी प्रतिक्रिया ग्रेग चॅपल यांनी दिली. क्रिकेट लाईफ स्टोरीज या पॉडकास्टमध्ये चॅपल बोलत होते. 'सौरव गांगुलीला टीममधून बाहेर केल्यानंतर इतर खेळाडूंनाही आपणही टीमबाहेर जाऊ शकतो, याची जाणीव झाली. 12 महिने टीम चांगलं क्रिकेट खेळली, पण नंतर विरोध वाढला. गांगुलीचं टीममध्ये पुनरागमन झालं. आम्हाला बदल नको, असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. बीसीसीआयने मला नवीन करार ऑफर केला होता, पण त्याला मी नकार दिला, कारण मला तेवढा ताण नको होता,' असं चॅपल म्हणाले.
  Published by:Shreyas
  First published: