Home /News /sport /

BCCI चे आभार मानत ग्रीम स्मिथने ऑस्ट्रेलिया-इंग्लंडवर साधला निशाणा, काय आहे प्रकरण?

BCCI चे आभार मानत ग्रीम स्मिथने ऑस्ट्रेलिया-इंग्लंडवर साधला निशाणा, काय आहे प्रकरण?

Graeme smith

Graeme smith

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक आणि माजी कर्णधार ग्रीम स्मिथ(Graeme smith) यांनी कोरोना महामारी काळात दक्षिण आफ्रिका बोर्डावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल टीम इंडियाचे आणि बीसीसीआयचे(BCCI) आभार मानले आहेत.

    नवी दिल्ली, 25 जानेवारी: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक आणि माजी कर्णधार ग्रीम स्मिथ(Graeme smith) यांनी कोरोना महामारी काळात दक्षिण आफ्रिका बोर्डावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल टीम इंडियाचे आणि बीसीसीआयचे(BCCI) आभार मानले आहेत. स्मिथ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत. मालिका निर्धारित वेळेत सुरु करण्याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या होत्या आणि योग्य व्यवस्था करण्यात यावी म्हणून कसोटी मालिका आठवडाभर पुढे ढकलण्यात आली होती. अखेर ही मालिका निर्धारित वेळापत्रकानुसार कोणत्याही अडथळ्याविना पार पडल्याने स्मिथ यांनी आनंद व्यक्त केला. स्मिथ यांनी , बीसीसीआय, सौरव गांगुली, व्यवस्थापन आणि टीम इंडिया संघाचे आभार ज्यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. या अनिश्चिततेच्या काळात तुमच्या प्रतिबद्धतेने एक आदर्श ठेवला आहे, ज्याचे अनुसरण बाकीचे करू शकतात.” आशा आशयाचे ट्विट केले आहे. नेमकं कुणाला उद्देशून केले हे ट्वीट हे ट्वीट करत त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डाला इशारा दिला आहे. कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियाने गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका पुढे ढकलली होती. तसेच, डिसेंबर २०२० मध्ये बायो बबल असतानाही कोरोना प्रकरणे सापडल्यामुळे मर्यादित षटकांची मालिका मधेच सोडून इंग्लंड संघ माघारी परतला होता. त्यामुळे हे ट्वीट या दोन देशांसाठी असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात सेंच्युरियनमधील विजयाने झाली होती, पण हा भारताचा या दौऱ्यामधील एकमेव विजय ठरला. कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेने शेवटचे दोन सामने जिंकत मालिका 2-1 ने आपल्या नावी केली. तसेच एकदिवसीय मालिकेत यजमान संघाने 3-0 ने मालिका नावावर केली. भारतीय संघ रविवारी केपटाउन येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयाच्या खूप जवळ पोहोचला होता. पण फक्त 4 धावांनी भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: BCCI, South africa, Team india

    पुढील बातम्या