सरकारी नोकरीत विचारला गेला धोनीवर अजब प्रश्न, नेटकरी झाले हैरान

सरकारी नोकरीत विचारला गेला धोनीवर अजब प्रश्न, नेटकरी झाले हैरान

तमिळनाडू पब्लिक सर्व्हिस कमीशनच्या पेपरमध्ये धोनीवर प्रश्न विचारण्यात आला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : भारताचा फिनीशर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीवर दिग्गज खेळाडूही चाहते झाले आहेत. क्रिकेट विश्वातील प्रत्येक विक्रमावर धोनीच्या नावाची मोहर असते. मात्र आता तर चक्क पेपरमध्ये धोनीच्या फलंदाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावरून सोशल मीडियावर नेटकरी हैरान झाले आहेत. तमिळनाडू पब्लिक सर्व्हिस कमीशनच्या पेपरमध्ये धोनीवर प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र हा प्रश्न धोनीच्या क्रिकेट करिअरवर नाही तर गणिताशी जोडलेला आहे.

हा प्रश्न असा होता की, धोनीच्या पहिल्या 30 सामन्यांची सरासरी होती 71 पण त्यानंतरच्या 31व्या सामन्यानंतर धोनीची सरासरी 73 झाली. तर धोनीनं आपल्या 31व्या सामन्यात किती धावा केल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यासाठी तीन पर्याय देण्यात आले होते. हे पर्याय होते 100, 103, 74, 108.

दरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतलेल्या धोनीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही निवड झालेली नाही. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरोधात भिडणार आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यात महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

वाचा-बुमराहच्या वेस्ट इंडिजमधल्या हॅट्ट्रिकचं इंग्लंड कनेक्शन!

म्हणून धोनीला संघात जागा नाही

इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, धोनीनं स्वत: दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यामुळं धोनीला या मालिकेत संघात जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळं ऋषभ पंतकडे विकेटकिपींगची जबाबदारी असणार आहे. धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही विश्रांती घेतली होती. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्येही धोनी सामिल होण्याची शक्यता कमी आहे.

वाचा-टीम इंडियाच्या जलद गोलंदाजाविरोधात अटक वॉरंट, विराटचे टेंशन वाढलं!

या धर्तीवर झाली संघाची निवड

आफ्रिकेविरोधात भारतीय संघाची 2020 टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोणातून निवड झाली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या संघात खेळाडूंची निवड करताना टी-20 वर्ल्ड कपचा निकष समोर ठेवला आहे. त्यामुळं धोनीला संघात जागा दिलेली नाही. भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2020आधी 22 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळं ची-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.

वाचा-वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी, भारतीय संघाला आहे धोका!

कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 08:18 PM IST

ताज्या बातम्या