Googleनं शोधला सचिनसाठी जावई, सारा तेंडुलकरनं 'या' क्रिकेटपटूशी केलं लग्न?

Googleनं शोधला सचिनसाठी जावई, सारा तेंडुलकरनं 'या' क्रिकेटपटूशी केलं लग्न?

सारा आणि गिल यांच्यात अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी दोघांचं लग्न झाल्याची खोटी माहित गुगलवर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) सध्या युवा खेळाडूंची जास्त चलती आहे. दिग्गज क्रिकेटपटूंऐवजी सध्या युवा खेळाडू संघांना सावरत आहेत. असाच एक युवा खेळाडू म्हणजे शुभमन गिल (shubhman gill). कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळणाऱ्या गिलला आतापर्यंत मोठी खेळी करता आली नसली तरी, त्यानं चांगली कामगिरी केली आहे. मात्र सध्या गिल एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

गुगलवर shubhman gill wife सर्च केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक साराचे नाव येत आहे. याआधी असाच प्रकार राशिद खानबाबत झाला होता. राशिद खान सर्च केल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा असल्याचे गुगल दाखवत होता. आता गुगलनं चक्क सारा आणि शुभमन गिलचं लग्न झाल्याचे दाखवले आहे. मात्र खरंतर शुभमन गिल 21 वर्षांचा असून त्याचं लग्न झालं नाही आहे. तर सारानं नुकताच आपला 23वा वाढदिवस साजरा केला.

याआधी शुभमन आणि सारा यांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत्या. याचं कारण म्हणजे शुभमनच्या एका फोटोवर सारानं केलेली कमेंट. गिलनं कार खरेदी केल्यानंतर त्यावर सारानं अभिनंदन अशी कमेंट केली होती. त्यावर गिलनं आभारी आहे असा रिप्लाय देत हार्ट इमोजी टाकले होते. यात हार्दिक पांड्यानं दोघांची मज्जा घेतली. त्यानंतर सारा आणि गिल यांनी एकच कॅप्शन असलेले फोटोही शेअर केले होते.

View this post on Instagram

23🕺🏻

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

सारा आणि गिल यांच्यात अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी दोघांचं लग्न झाल्याची खोटी माहित गुगलवर येत आहे. गुगल सर्च इंजिनमध्ये मात्र काहीही सर्च केल्यानंतर वेगळे रिझल्ट येत आहेत. असाच प्रकार अनुष्का आणि राशिदबाबत घडला होता.

Published by: Priyanka Gawde
First published: October 15, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading