काय सांगता! अनुष्का शर्मा आहे राशिद खानची पत्नी? 'या' गोष्टीमुळे उडाला गोंधळ

काय सांगता! अनुष्का शर्मा आहे राशिद खानची पत्नी? 'या' गोष्टीमुळे उडाला गोंधळ

Google सर्चमध्ये ‘Rashid Khan wife’ टाइप केल्यावंतर अनुष्का शर्माचे नाव येत आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघातून खेळणाऱ्या राशिद खानने मैदानावर दहशत निर्माण केली आहे. या हंगामातही त्यानं आतापर्यंतच्या 7 सामन्यात त्याने 10 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे सर्च इंजिन गुगलमुळे राशिद क्रिकेट नाही तर दुसऱ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण Googleवर अफगाणिस्तानच्या पत्नीचे नाव सर्च केल्यास जो रिझल्ट येतो ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

गुगलवर राशिद खानच्या पत्नीचे नाव शोधले असता अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) नाव येत आहे. म्हणजे गुगलच्या मते अनुष्का ही राशिद खानची पत्नी आहे. अनुष्का शर्मा ही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आहे. विराट कोहली हा आयपीएल टीम आरसीबीचा कर्णधारही आहे. आता प्रश्न असा आहे की गुगल अनुष्का शर्माला राशिद खानची पत्नी का सांगत आहे?

वाचा-दोन युवा खेळाडूंमध्ये LIVE सामन्यातच राडा, एकमेकांच्या अंगावर धावून गेले अखेर...

वाचा-दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका, तब्बल 1 आठवडा खेळणार नाही 'हा' स्टार खेळाडू!

1998 मध्ये जन्मलेला राशिद खान हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा उप-कर्णधार आहे. जून 2018 मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानातील पहिला कसोटी सामना खेळणारा तो 11 क्रिकेटपटूंपैकी एक होता. एक वर्षानंतर बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात राशिदने संघाचे नेतृत्व केले. त्याशिवाय वयाच्या 20 व्या वर्षी कसोटी सामन्यात कर्णधार झालेला तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला.

Google सर्चमध्ये ‘Rashid Khan wife’ टाइप केल्यावंतर अनुष्का शर्माचे नाव येत आहे. यात अनुष्का शर्मा राशिदची पत्नी असेही लिहिले आहे. त्याखाली लग्नाची तारीख 11 डिसेंबर 2017 लिहिण्यात आली आहे. मात्र विराट कोहली आणि अनुष्का यांचे लग्न 11 डिसेंबर 2017 रोजी झाले होते.

वाचा-रोहित शर्मासोबत तुलना, पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणतो...

दरम्यान राशिदनं इन्स्टाग्रामवर आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रींबाबत विचारले असता त्याने अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटा यांचे नाव घेतले होता. यानंतर राशिद खानचे नाव चर्चेत आले होते. राशिद आणि अनुष्का यांचे हे एकच कनेक्शन आहे. यामुळे गुगल सर्चमध्ये चक्क अनुष्काचे नाव सर्च केल्यानंतर राशिद खानची पत्नी असे दाखवत असेल.

Published by: Priyanka Gawde
First published: October 12, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या