• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • न्यूझीलंडच्या 'या' अपयशी कामगिरीमुळे विराटसेनेचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळाच

न्यूझीलंडच्या 'या' अपयशी कामगिरीमुळे विराटसेनेचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळाच

new zealand with team india

new zealand with team india

टीम इंडियाचे (Team India) सेमीफायनलचे तिकिट हे न्यूझीलंडच्या पराभवावर अवलंबून आहे. पण न्यूझीलंडच्या रेकॉर्ड्सवर नजर टाकली तर भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) ही टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाची मॅच आता सुरू झाली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचं (Team India) भवितव्य या मॅचवर अवलंबून आहे. या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलला प्रवेश करणारी चौथी टीम कोणती? हे या मॅचनंतर स्पष्ट होणार असले तरी न्यूझीलंड संघाची (New Zealand )कामगिरी पाहाता विराटसेनेला सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळाच आहे असे म्हणायला हरकत नाही. असे म्हणण्याचे कारण ही तसेच आहे. न्यूझीलंड संघांमध्ये एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. दोन वेळेस या संघाला सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाने सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंड संघाला 6 गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर 2016 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाला 7 गडी राखून पराभूत केले होते. फक्त टी२० विश्वचषकात नव्हे तर, न्यूझीलंड संघाने 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध पार पडलेला हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड संघाने बाजी मारली होती. टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड संघाला फायनल, सेमीफायनल आणि उपांत्यपूर्व फेरीत मिळून खेळलेल्या 44 सामन्यांपैकी फक्त 13 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर 30 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु गेल्या काही वर्षात न्यूझीलंड संघाची नॉक आऊट सामन्यांमध्ये खराब कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यांनी गेल्या 5 नॉकआऊट सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. यामध्ये 2015 आणि 2019 वर्ल्ड कप स्पर्धेचा देखील समावेश आहे. 2019 मध्ये झालेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. तर 2015 मध्ये झालेल्या उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यात यश आले होते. न्यूझीलंड संघाची नॉकआउट सामन्यांमधील कामगिरी पाहता विराटसेनेचे सेमीफायनल गाठणं निश्चित असे म्हणायला हरकत नाही. न्यूझीलंडसाठी अफगाणिस्तानचा सामना हा उपांत्यपूर्व फेरीसारखाच आहे. कारण हा सामना जिंकल्यावरच त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचे टेंशन चांगलेच वाढलेले असेल. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे गोलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत आणि न्यूझीलंडला आतापर्यंत दमदार कामगिरी करता आलेली नाही. कारण न्यूझीलंडला स्कॉटलंडसारख्या संघाविरुद्ध फक्त १६ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे टीम इंडियासाठी या महत्वाच्या सामन्यापूर्वी ही एक आनंदाची गोष्ट समोर आली आहे. पण, या सामन्यात आता नेमकं काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: