टेनिसची गोल्डन गर्ल, ती मैदानावर उतरली की जिंकूनच जायची!

80 आणि 90 च्या दशकात टेनिसच्या कोर्टवर अधिराज्या गाजवणाऱ्या स्टेफीच्या विक्रमाच्या आसपासही आताचे खेळाडू नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 04:58 PM IST

टेनिसची गोल्डन गर्ल, ती मैदानावर उतरली की जिंकूनच जायची!

टेनिसची गोल्डन गर्ल स्टेफी ग्राफ 14 जूनला 50 वर्षांची झाली. मी वयातच टेनिस जगतात नाव कमावलेल्या जर्मनीच्या स्टेफीनं 80 आणि 90 च्या दशकात टेनिस कोर्ट गाजवलं. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तिनं टेनिस शिकायला सुरुवात केली. जर्मनीत ती वंडर गर्ल झाली आणि नंतर जगभर ख्याती पसरली. तिच्यामुळे जागतिक टेनिसमध्ये नवं युग सुरू झालं म्हणायला हरकत नाही.

स्टेफीनं टेनिस कोर्टवर पाऊल टाकलं त्यावेळी मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एवर्ट यांचा दबदबा होता. मात्र, तिच्या येण्यानं सगळं चित्र पालटलं. स्टेफी आणि विजय हे समीकरण झालं होतं. आताच्या घडीला सेरेना विल्यम्सच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पण तिलाही स्टेफी ग्राफच्या जवळपास पोहचता आलं नाही. स्टेफीनं 22 ग्रांप्री विजेतेपदं पटकावली  आहेत. तसेच 377 आठवडे नंबर वनवर राहण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे.

टेनिस जगताने पहिल्यांदा 1987 मध्ये स्टेफी ग्राफचा खेळ बघितला. फ्रेंच ओपन मध्ये सर्वात युवा खेळाडू म्हणून उतरलेल्या स्टेफीने विजेतेपद पटकावून आपल्या युगाचा प्रारंभ असल्याचंच जणू सांगितलं होतं. त्यानंतर चार ग्रॅण्डस्लॅम आणि ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल जिंकून तिनं दबदबा कायम राखला.

Loading...

जर्मनीमध्ये त्यावेळी बोरिस बेकर आणि स्टेफी ग्राफ यांना विम्बल्डनमध्ये खेळताना पाहून चाहते म्हणायचे की दोघांनी लग्न केलं पाहिजे. दोघांनीही 1989 मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. एकाच देशाच्या या दोन चॅम्पियननी लग्न करावं अशी चाहत्यांची इच्छा होती.

स्टेफी ग्राफने तिच्या कारकिर्दीत 107 विजेतेपदं पटकावली. प्रोफेशनल करिअरमध्ये 900 पेक्षा जास्त सिंगल सामने खेळे त्यातील केवळ 100 च्या आसपास सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला.

स्टेफी ग्राफच्या करिअरचा ग्राफ वेगाने वाढत असताना वडिलांमुळे खूप त्रास सहन करावा लागला. वडिलांवर टॅक्स चोरीचा आरोप झाला आणि त्यांना तुरुंगवासही झाला. तेव्हा स्टेफीला बदनामीचा सामना करावा लागला. तिचे वडीलच व्यवस्थापक म्हणून काम पहायचे. मात्र, या प्रकरणानंतर त्यांना व्यवस्थापक पदावरून हटवलं.

90 च्या दशकात सुरुवातीला तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचा खेळावर परिणाम झाला. तिला ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये पराभव झाला. अर्थात त्यावेळी तीला दुखापतींने त्रस्त केले होते.

स्टेफीनं 1999 मध्ये फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅमचं विजेतेपद पटकावलं होतं. टेनिस कारकिर्दीला साजेसा समारोप होता. त्यानंतर दोन महिने दुखापतीने टेनिसपासून दूर राहिलेल्या स्टेफीनं निवृत्ती घेतली. त्यावेळी आपल्याला खूप छान वाटत असल्याचं तिनं म्हटलं होतं.

निवृत्तीनंतर स्टेफी ग्राफ आणि टेनिसपटू आंद्रे आगासी यांच्यात जवळीकता वाढली. दोघांचाही जीव टेनिसवर होता. 1999 मध्ये दोघांच्या प्रेमाची चर्चा सुरू होती. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्न केलं.

स्टेफी आता बिझनेस वूमन झाली आहे. तिची आणि पतीची कंपनी आहे. त्याशिवाय चॅरिटीच्या माध्यमातून कामही करते. टेनिसला बाय बाय केल्यानंतर 2009 मध्ये विंबल्डनच्या एका प्रदर्शनासाठी ती पतीसोबत उपस्थित होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: tennis
First Published: Jun 14, 2019 04:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...