Asian Games 2018: गोळाफेकमध्ये 'सिंग इज किंग', तेजिंदरपाल सिंगने पटकावले सुवर्णपदक

Asian Games 2018: गोळाफेकमध्ये 'सिंग इज किंग', तेजिंदरपाल सिंगने पटकावले सुवर्णपदक

  • Share this:

जकार्ता, 25 आॅगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकमध्ये तेजिंदरपाल सिंगने भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. गोळाफेक स्पर्धेत भारताची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सातव्या दिवशी भारतासाठी कही खुशी कही गम असाच होता. पण संध्याकाळी तेजिंदरपाल सिंगनं गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून दिले. तेजिंदरपाल सिंग 19.96 मिटरसह आघाडीवर होता. त्याने शेवटपर्यंतही आघाडी कायम ठेवली आणि अखेर सुवर्णपदक पटकावले. भारताचे हे सातवे सुवर्णपदक आहे. याआधी रोहन बोपण्णा- दिवीज शरण जोडीने सुवर्णपदक मिळवून दिले. रोइंग टीम, कोल्हापूरची कन्या राही सरनोबत,सौरभ चौधरी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

तर दुसरीकडे 10 हजार मिटर स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा आली. भारतची सूर्या लोगानाथन या स्पर्धेत फायनलमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. तर संजीवनी बाबूराव जाधव ननव्यवा स्थानावर होती. त्यामुळे त्यांचे सुवर्णपदकाचे स्वप्न अपुरे राहिले.

VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स

First published: August 25, 2018, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading