युवराज सिंग गंभीर जखमी, सामना सुरु असतानाच सोडलं मैदान!

युवराज सिंग गंभीर जखमी, सामना सुरु असतानाच सोडलं मैदान!

निवृत्तीनंतर Canada T-20 Global League खेळणाऱ्या युवराज सिंगनं या स्पर्धेतही आपली छाप सोडली आहे.

  • Share this:

टोरंटो, 05 ऑगस्ट : निवृत्तीनंतर Canada T-20 Global League खेळणाऱ्या युवराज सिंगनं या स्पर्धेतही आपली छाप सोडली आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या युवराजला मात्र दुखापतींचा सामना करावा लागत आहे. ग्लोबल टी-20 स्पर्धेत आपली छाप सोडणाऱ्या युवराजला सामना सुरु असतानाच मैदान सोडावं लागलं. रविवारी मॉन्ट्रियल टायगर्सविरोधात खेत असताना युवीनं मैदान सोडलं.

मॉन्ट्रियल टायगर्स आणि टोरंटो नॅशनल्स यांच्यात झालेल्या सामन्यात 137 धावांचा पाठलागत करताना टोरंटोची अवस्था बिकट असताना कर्णधार युवराज सिंगनं जबाबदारी स्विकारली. केवळ 73 धावांवर तीन झटके लागल्यानंतर युवराज सिंग मैदानात आला. मात्र दुसऱ्याच चेंडूवर युवी पाठ पकडून मैदानात मैदानात बसला. त्याच्या पाठीचा त्रास एवढा वाढला की, त्याला मैदान सोडावे लागले. दोन चेंडूचा सामना करत असताना युवीला एकदी धाव काढता आली नाही आहे.

ख्रिस ग्रीनने सावरला डाव

कर्णधार युवी मैदानाबाहेर पडल्यानंतर ख्रिस ग्रीन या फलंदाजानं डाव सावरला. संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढत चार विकेटनं विजय मिळवून दिला. टोरंटो संघानं 137 धावांचा पाठलाग 15 चेंडू शिल्लक ठेवत जिंकला. त्यामुळं सध्या प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी युवराजचा संघ सज्ज आहे.

वाचा- उपाशीपोटी कोल्हापूरच्या लेकीनं गाजवल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी हवा मदतीचा हात!

युवीचा कमबॅक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजनं ग्लोबल लीग खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर युवीनं शानदार कमबॅक केला. वोल्सविरोधात त्यानं 51 धावांची खेळी केली, त्याचबरोबर 1 विकेटही घेतली. युवीच्या खेळीच्या जोरावर संघानं सामनेही जिंकले. मात्र आता जखमी झाल्यामुळं त्याला पुढचे सामने खेळता येणार की नाही याबाबत साशंकता आहे.

वाचा-विराट-रोहित एकमेकांशी नजरही मिळवत नाहीत, BCCIने शेअर केलेल्या व्हिडिओची चर्चा

वाचा-फक्त जाहिरातीतून विराट कमवतो 146 कोटी, रोहितचा पगार वाचून तुमचे डोळे चक्रावतील!

मृत्यूच्या दाढेत 'तो' जीव मुठीत घेऊन उभा, पाहा हा LIVE VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 5, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading