Canada Global T20 : युवी इज बॅक! सिक्सर किंगनं केली पाक गोलंदाजाची धुलाई

पाकिस्तानच्या शादाबच्या एकाच षटकात युवीनं 2 षटकार आणि 2 चौकार लगावले.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 01:56 PM IST

Canada Global T20 : युवी इज बॅक! सिक्सर किंगनं केली पाक गोलंदाजाची धुलाई

टोरंटो, 28 जुलै : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा युवराज सिंग सध्या कॅनेडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20मध्ये आपले नशीब आजमावत आहे. पहिल्या सामन्यात केलेल्या निराशाजनक खेळीनंतर युवीनं टी-20मध्ये दमदार कमबॅक केला. टोरंटो नॅशनल्सचा कर्णधार असलेल्या युवीनं एडमॉन्टन रॉयल्स विरोधात झालेल्या सामन्यात 21 चेंडूत 35 धावा केल्या. युवीच्या या खेळीच्या जोरावर त्यांच्या संघानं सामना जिंकला.

युवराजनं आपल्या खेळीत तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. यावेळी युवीनं पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खानची चांगलीच धुलाई केली. एडमॉन्टन रॉयल्स संघानं प्रथम फलंदाजी करताना युवीच्या संघाला 191 धावांचे तगडे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना युवीच्या दमदार खेळीनं टोरंटो नॅशनलनं सामना जिंकला.

सिक्सर किंगची धमाकेदार खेळी

पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या युवीनं दुसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. फिरकी गोलंदाजांची तर युवीनं शाळाच घेतली. पाकिस्तानच्या शादाबच्या एकाच षटकात युवीनं 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. यावेळी युवराजचे शॉट्स पाहून शादाबही हैराण झाला.

वाचा-वेस्ट इंडिज दौऱ्याआधी कर्णधार कोहलीनं घेतला 'पंगा'

मनप्रीत गोनीची शानदार खेळी

या सामन्यात फक्त युवराज सिंगच नाही तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या मनप्रीत गोनीनंही चांगली फलंदाजी केली. गोनीनं 12 चेंडूत 33 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. गोनीनं न्यूझीलंडच्या जिम्मी निशामची धुलाई केली.

वाचा-धवननं घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चाहते विचारतात कधी करणार पक्षप्रवेश!

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

VIDEO: भावुक क्षण! ऑपरेश 'महालक्ष्मी'मध्ये माकडाचीही सुटका, NDRF जवानाला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...