Global T20 League : सिक्सर किंग युवराज सिंगची फसवणूक!

Global T20 League :  सिक्सर किंग युवराज सिंगची फसवणूक!

Global T20 League : याआधी ग्लोबल टी-20 स्पर्धेत मॅक्स फिक्सिंगचा प्रकार घडला होता.

  • Share this:

टोरंटो, 08 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंगने ग्लोबल टी-20 स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली. मात्र, आता हीच स्पर्धा मोठ्या वादात अडकली आहे. बुधवारी युवराजचा संघ टोरंटो नॅशनल आणि मॉन्टरियल टायगर्स यांचा सामना होणार होता. मात्र हा सामना वेळेत सुरु झाला नाही, याच कारण आश्चर्यकारक आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही संघाचे खेळाडू वेळेत पोहचले नाहीत म्हणून हा सामना उशीरा सुरु झाला. याचे कारण म्हणजे 18 सामने होऊनही युवराज सिंगसह खेळाडूंना मानधन मिळालेले नाही.

दोन्ही संघातील खेळाडूंना पैसे न मिळाल्यामुळं त्यांनी सामना खेळण्यास नकार दिला. मात्र चाहत्यांची गर्दी पाहता, खेळाडूंनी खेळण्याचा निर्णय घेतला. याआधी याच स्पर्धेत ग्लोबल टी-20 सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ग्लोबल टी-20 लीग कॅनडामध्ये होणारी स्पर्धा होत असली तरी भारताबरोबरच इतर सर्वच देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. त्याच प्रमाणे कॅनडा आणि अमेरिका या देशांमध्ये या स्पर्धेचा चाहता वर्गही आहे. त्यामुळंचे फिक्सिंगच्या प्रकारांना वेग आल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

अकमलला केला होता फिक्सिंगसाठी संपर्क

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकमल विनीपेग हॉक्स संघाकडून खेळत आहे. तेथेच त्याची मंसूर अख्तरशी संपर्क झाला. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर मंसूर अख्तर गायब आहेत. अकमल यांनी दिलेल्या माहितीत, मंसूर यांनी फिक्सिंगसाठी संपर्क केला होता, मात्र मी लगेचच बोर्डाला कळवल्यामुळं याबाबत मला आणखी माहिती नाही, असे सांगितले.

फिक्सिंगमध्ये याआधी अडकले हे पाकिस्तानी खेळाडू

फिक्सिंग आणि पाकिस्तान यांचे फार जुने संबंध आहेत. याआधी पाकिस्तान सुपर लीगमध्ये नासिर जमशेद, शर्जील खाल, खालिद लतीफ यांसारखे युवा खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले होते. त्यातच जलद गोलंदाज मोहम्मद इरफान आणि मोहम्मद नवाजही फिक्सिंगमध्ये अडकले होते.

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 8, 2019, 2:58 PM IST

ताज्या बातम्या