Global T20 Canada : सिक्सर किंग युवीचा धमाका, दुखापतीनंतरही पुन्हा एकदा गाजवलं मैदान!

विन्निपेग हॉक्स यांच्या विरोधात खेळताना युवीनं 26 चेंडूत 45 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 12:00 PM IST

Global T20 Canada : सिक्सर किंग युवीचा धमाका, दुखापतीनंतरही पुन्हा एकदा गाजवलं मैदान!

टोरंटो, 30 जुलै : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग कॅनडामध्ये क्रिकेट खेळत आहे. निवृत्ती घेतल्यानंतर युवराज ग्लोबल कॅनडा टी-20 लीगध्ये टोरंटो नॅशनलचा कर्णधार म्हणून खेळत आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात युवराज सिंगनं आपल्या फलंदाजीनं कमाल केली. विन्निपेग हॉक्स यांच्या विरोधात खेळताना युवीनं 26 चेंडूत 45 धावा केल्या. हंगमातील सातव्या सामन्यात युवीच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर टोरंटोनं 217 धावांपर्यंत मजल मारली.

मात्र, युवराजच्या आक्रमक खेळीनंतर टोरंटोला हा सामना जिंकला आला नाही. शेवटच्या चेंडूवर टोरंटोला हा सामना गमवावा लागला. युवराजनं या सामन्यात गोलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. त्यानं 18 धावा देत 1 विकेट घेतली. नाणेफेक जिंकत हॉक्स संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टोरंटो संघाचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर युवीनं फलंदाजीची धुरा सांभाळली. सलामीचा फलंदाज रोड्रिगो थॉमसनं कर्णधार युवराजसोबत 200चा आकडा पार केला. युवीनं आपल्या खेळीत दोन षटकार आणि चार चौकार लगावले. मात्र अर्धशतकी खेळी करता आली नाही. 13व्या ओव्हरमध्ये युवी मोठा शॉट मारण्याचा नादात क्लिन बोल्ड झाला.

वाचा-सानियानंतर आणखी एक भारतीय पाकची सून, 'या' क्रिकेटपटूसोबत अडकणार विवाहबंधनात

वाचा-विराट म्हणतो संघात वाद नाही, पण 'हे' फोटो सांगतात वेगळीच कहानी!

दुखापतीनंतर केलं शानदार कमबॅक

युवीबरोबर थॉमसनं 65 तर पोलार्डनं 52 धावा केल्या. पोलार्डनं 21 चेंडूत 3 चौकार आणि पाच षटकार लगावत आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात फेल झाल्यानंतर युवीनं दुसऱ्या सामन्यात 21 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. दरम्यान पहिल्याच सामन्यात युवीच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र त्यातून सावरत युवीनं दमदार कमबॅक केलं.

वाचा- 'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...