Global T20 Canada : युवराज खेळत असलेल्या स्पर्धेत फिक्सिंगसाठी रचला होता सापळा, काय झालं पाहा

Global T20 Canada : युवराज खेळत असलेल्या स्पर्धेत फिक्सिंगसाठी रचला होता सापळा, काय झालं पाहा

Global t20 canada : ग्लोबल टी-20 सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:

टोरंटो, 07 ऑगस्ट : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगनं(Yuvraj Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत ग्लोबल टी-20 लीग खेळण्याचा निर्णय घेतला. युवी टोरंटो नॅशनल्स संघाचा कर्णधार, त्यानं आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरीही केली आहे. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ग्लोबल टी-20 सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल (Umar Akmal) नं खुलासा केला आहे की, फिक्सिंगसाठी त्याला बुकीकडून संपर्क करण्यात आला होता. यासंदर्भात त्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डला माहिती दिली आहे.

ग्लोबल टी-20 लीग कॅनडामध्ये होणारी स्पर्धा होत असली तरी भारताबरोबरच इतर सर्वच देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. त्याच प्रमाणे कॅनडा आणि अमेरिका या देशांमध्ये या स्पर्धेचा चाहता वर्गही आहे. त्यामुळंचे फिक्सिंगच्या प्रकारांना वेग आल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

वाचा- सचिनची 30 वर्षांपूर्वी ज्यांनी केली निवड, त्यांनीच दिली अर्जुनला संघात जागा!

पाकच्या माजी क्रिकेटपटूच्या अडचणी वाढणार

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून उमर अकमल याला फिक्सिंग करिता संपर्क करण्यात आला असल्यामुळं त्याच्या अडचणी सध्या वाढल्या आहेत. अकमलला संपर्क करण्यात आलेल्याचं नाव मंसूर अख्तर असल्याचे बोलले जात आहे. मंसूर अख्तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू असून 1980 ते 1990मध्ये 19 कसोटी सामने, 41 एकदिवसीय सामने त्यानं खेळले आहेत. ग्लोबल टी20च्या लाचलुचपत विभागाचे अधिकारी यासंदर्भात चौकशी करणार आहेत.

वाचा-ICCचे 'नो बॉल' तंत्रज्ञान, आता वन डे सामन्यांचे चित्रच बदलणार!

अकमलला असा केला होता संपर्क

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकमल विनीपेग हॉक्स संघाकडून खेळत आहे. तेथेच त्याची मंसूर अख्तरशी संपर्क झाला. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर मंसूर अख्तर गायब आहेत. अकमल यांनी दिलेल्या माहितीत, मंसूर यांनी फिक्सिंगसाठी संपर्क केला होता, मात्र मी लगेचच बोर्डाला कळवल्यामुळं याबाबत मला आणखी माहिती नाही, असे सांगितले.

वाचा-चाहर बंधूआधी 'या' भावांच्या जोडीनं गाजवलं क्रिकेटचं मैदान!

फिक्सिंगमध्ये याआधी अडकले हे पाकिस्तानी खेळाडू

फिक्सिंग आणि पाकिस्तान यांचे फार जुने संबंध आहेत. याआधी पाकिस्तान सुपर लीगमध्ये नासिर जमशेद, शर्जील खाल, खालिद लतीफ यांसारखे युवा खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले होते. त्यातच जलद गोलंदाज मोहम्मद इरफान आणि मोहम्मद नवाजही फिक्सिंगमध्ये अडकले होते.

वाचा-सचिनची 30 वर्षांपूर्वी ज्यांनी केली निवड, त्यांनीच दिली अर्जुनला संघात जागा!

VIDEO : सांगलीत तुरुंगाला पुराचा वेढा, 400 कैद्यांना हलवणार

Published by: Akshay Shitole
First published: August 7, 2019, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading