Global T20 Canada 2019 : आऊट नसतानाही युवीनं सोडलं मैदान, चाहते भडकले; पाहा VIDEO

टी-20 लीगच्या पहिल्याच सामन्यात युवी फ्लॉप झाला. वनकुअर नाइट्स विरोधात युवीनं 27 चेंडूत केवळ 14 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 12:57 PM IST

Global T20 Canada 2019 : आऊट नसतानाही युवीनं सोडलं मैदान, चाहते भडकले; पाहा VIDEO

टोरंटो, 26 जुलै : भारतीय संघाला 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंगनं काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या सिक्सर किंग युवी कॅनेडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20 स्पर्धेत खेळत आहे. यात टोरंटो संघांचे कर्णधारपद भुषवत असलेल्या युवीनं गुरुवारी पहिला सामना खेळला.

मात्र टी-20 लीगच्या पहिल्याच सामन्यात युवी फ्लॉप झाला. वनकुअर नाइट्स विरोधात युवीनं 27 चेंडूत केवळ 14 धावा केल्या. मात्र युवी बाद झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कर्णधार युवीनं टोरंटो नॅशनलनं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, चार महिन्यांनंतर क्रिकेट खेळणाऱ्या युवराजला बॅट आणि बॉल यांचा संपर्क करणे कठीण जात होते. ऑफ साईडच्या बाहेर असलेला शॉट खेळण्याचा मोह युवीला आवरता आला नाही, चेंडू विकेटकिपरच्या हातात गेला. मात्र त्याला कॅच पकडला आला नाही. पण विकेटकिपरनं युवीला स्टम्प आऊट केले, दरम्यान युवी क्रिजमध्येच होता. असे असले तरी, युवी बाद नसताना मैदानाबाहेर गेला. त्यामुळं चाहते भडकले आहेत.

वाचा-षटकार तर सोडा, एक चौकारही लगावता आला नाही युवराजला!

Loading...

 

View this post on Instagram

 

Yuvraj Singh walked off the field despite being not out ‍♂️ @yuvisofficial #YuvrajSingh #GT20

A post shared by Thakur Hassam (@thakurhassam_gt) on

दरम्यान निवृत्तीनंतर टी-20 सामना खेळत असलेल्या युवीला या खेळीतही दुखापतींचा सामना करावा लागला. फलंदाजी करत असताना अचानक युवीच्या कमरेत दुखू लागले. मात्र त्यानं मैदान सोडले नाही. वनकुअर नाइट्स विरोधात झालेल्या या सामन्यात टोरंटो संघानं 159 धावा केल्या. मात्र या आव्हानाचा वनकुअर नाइट्सनं यशस्वी पाठलाग केला.

वाचा- विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग

वाचा-...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही

VIDEO: गर्लफ्रेंडच्या घरी सापडला नवरा, संतापलेल्या बायकोनं केली दोघांची धुलाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...