Canada Global T20 : प्रेम युगुलांमध्ये युवी बनला 'कबाब में हड्डी', पाहा हा मजेशीर VIDEO

Canada Global T20 : प्रेम युगुलांमध्ये युवी बनला 'कबाब में हड्डी', पाहा हा मजेशीर VIDEO

पहिल्या सामन्यात केलेल्या निराशाजनक खेळीनंतर युवीनं टी-20मध्ये दमदार कमबॅक केला.

  • Share this:

टोरंटो, 29 जुलै : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा युवराज सिंग सध्या कॅनेडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20मध्ये आपले नशीब आजमावत आहे. पहिल्या सामन्यात केलेल्या निराशाजनक खेळीनंतर युवीनं टी-20मध्ये दमदार कमबॅक केला. टोरंटो नॅशनल्सचा कर्णधार असलेल्या युवीनं एडमॉन्टन रॉयल्स विरोधात झालेल्या सामन्यात 21 चेंडूत 35 धावा केल्या. युवीच्या या खेळीच्या जोरावर त्यांच्या संघानं सामना जिंकला.

मात्र या सगळ्यात युवीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. ग्लोबल टी-20 क्रिकेट खेळत असलेला युवी आपल्या सामन्याआधी सराव करत असताना जोडप्याच्यामध्ये आला. स्टार ऑलराऊंडर बेन कटिंग यांची मुलाखत त्याची गर्लफ्रेण्ड एरिन हॉलेंड घेत होती. यावेळी युवराजनं मस्करी करत, या मुलाखतीत घुसला आणि "तुम्ही सराव करत नाहीत का? मग लग्न कधी आहे", असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(वाचा :धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!)

(वाचा : 'तो' निर्णय घेऊन धर्मसेना यांनी काहीच चुक केली नाही-ICC)

ग्लोबल टी-20 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या युवीनं दुसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. फिरकी गोलंदाजांची तर युवीनं शाळाच घेतली. पाकिस्तानच्या शादाबच्या एकाच षटकात युवीनं 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. यावेळी युवराजचे शॉट्स पाहून शादाबही हैराण झाला. एडमॉन्टन रॉयल्स संघानं प्रथम फलंदाजी करताना युवीच्या संघाला 191 धावांचे तगडे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना युवीच्या दमदार खेळीनं टोरंटो नॅशनलनं सामना जिंकला.

वाचा :

(वाचा :दारूच्या नशेत 'या' दिग्गज फलंदाजानं केल्या होत्या झंझावती 150 धावा!)

मनप्रीत गोनीची शानदार खेळी

या सामन्यात फक्त युवराज सिंगच नाही तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या मनप्रीत गोनीनंही चांगली फलंदाजी केली. गोनीनं 12 चेंडूत 33 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. गोनीनं न्यूझीलंडच्या जिम्मी निशामची धुलाई केली.

वाचा-पुन्हा वाद चिघळला, रोहितमुळे विराटनं पत्रकार परिषद घेण्यास दिला नकार!

पुण्यात तब्बल 64 हजारांच्या बनावट नोटा जप्त; यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: July 29, 2019, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading