मुंबई, 22 फेब्रुवारी : आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2021) यावर्षीही पैशांचा पाऊस पडला. अनेक क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची बोली लागली. दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर क्रिस मॉरिस (Chris Morris) हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. तर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर काईल जेमिसन (Kyle Jamieson) वर बंगळुरूने 15 कोटींची बोली लावली. ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) बंगळुरूनेच 14.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएल लिलावात बंगळुरूने जेमिसन आणि मॅक्सवेल या दोन खेळाडूंवरच 29.25 कोटी रुपये खर्च केले.
आयपीएल लिलावानंतर झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये मॅक्सवेल आणि जेमिसन अपयशी ठरले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (New Zealand vs Australia) यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये दोन्ही खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. 5 बॉलमध्ये 1 रन करून मॅक्सवेल आऊट झाला, तर बॉलिंगमध्ये त्याने एका ओव्हरमध्ये 9 रन दिले.
आयपीएलच्या मागच्या मोसमात मॅक्सवेल पंजाबकडून खेळला. 2020 सालच्या आयपीएल लिलावात मॅक्सवेलला पंजाबने 10.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं, पण संपूर्ण मोसमात तो सुपर फ्लॉप ठरला. संपूर्ण मोसमातल्या 13 मॅचमध्ये मॅक्सवेलने 15 च्या सरासरीने 108 रन केल्या, त्याला स्पर्धेत एकही सिक्स मारता आली नाही, त्यामुळे पंजाबने मॅक्सवेलला सोडण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.