फॉरेनचा जावई! देसी अवतारात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतीय तरुणीसोबत दुसऱ्यांदा केला साखरपुडा

आपल्या आक्रमक फलंदाजीनं सर्वांचे मन जिंकणाऱ्या एका ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं भारतीय तरुणीची साखरपुडा केला आहे.

आपल्या आक्रमक फलंदाजीनं सर्वांचे मन जिंकणाऱ्या एका ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं भारतीय तरुणीची साखरपुडा केला आहे.

 • Share this:
  मेलबर्न, 15 मार्च : आपल्या आक्रमक फलंदाजीनं सर्वांचे मन जिंकणाऱ्या एका ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं भारतीय तरुणीची साखरपुडा केला आहे. मुख्य म्हणजे या खेळाडूने दुसऱ्यांदा भारतीय तरुणीसोबत साखरपुडा केला आहे. ग्लेन मॅक्सवेलने आपली भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत भारतीय पद्धतीनुसार दुसऱ्यांदा साखरपुडा केला. याआधी 27 फेब्रुवारी रोजी मॅक्सवेलनं सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, साखरपुडा केला होता. आता त्यानं भारतीय पद्धतीने विनीसोबत पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे.
   
  View this post on Instagram
   

  A post shared by Glenn Maxwell (@gmaxi_32) on

  मॅक्सवेलची गर्लफ्रेंड विनी रमनने तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मॅक्सवेल कुर्ता तर विनीने लेहेंगा परिधान केला आहे. मॅक्सवेलचा हा देसी अवतार भारतीय चाहत्यांना चांगला आवडला आहे.
  याआधी मॅक्सवेलनं मानसिक स्वाथ्यामुळं क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेलने, 'माझी जोडीदार विनीने मला सल्ला दिला की मी कोणाशी तरी बोलावे. माझा मानसिक ताणतणाव ओळखणारी ती पहिली व्यक्ती होती. मी खरतर तिचे आभार मानले पाहिजेत”, असे सांगितले होते. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठिण प्रसंगी विनी त्याच्यासोबत होती.
  First published: