Home /News /sport /

माझ्याशी लग्न करशील? स्कॅण्डलमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी खेळाडूला Live Show मध्ये मुलीने केलं प्रपोज

माझ्याशी लग्न करशील? स्कॅण्डलमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी खेळाडूला Live Show मध्ये मुलीने केलं प्रपोज

पाकिस्तानचा डावखुरा ओपनर इमाम उल हक (Imam Ul Haq) याला एका लाईव्ह कार्यक्रमात महिलेने लग्नासाठी विचारलं, त्यावेळी त्याला धक्काच बसला. इमाम उल हकने मागच्या काही काळात पाकिस्तानला बऱ्याच मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 मे : पाकिस्तानचा डावखुरा ओपनर इमाम उल हक (Imam Ul Haq) याला एका लाईव्ह कार्यक्रमात महिलेने लग्नासाठी विचारलं, त्यावेळी त्याला धक्काच बसला. इमाम उल हकने मागच्या काही काळात पाकिस्तानला बऱ्याच मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मुलीने जेव्हा इमालला लग्नाबाबत विचारलं तेव्हा तो अवाक झाला, तसंच काय उत्तर द्यायचं हे त्याला कळलं नाही, पण काही वेळानंतर तो हसायला लागला. इमामचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 26 वर्षांचा इमाम जियो न्यूजचा कार्यक्रम 'हसना मना है' या कार्यक्रमात आला होता, त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलीने त्याला लग्नासाठी विचारणा केली. यानंतर हसत इमाम मी काय म्हणू शकतो? असा प्रश्न विचारला. तेव्हा प्लीज नाही म्हणू नकोस, अशी विनंती मुलीने इमामला केली. यासाठी तुला माझ्या आईकडे जावं लागेल, तीच याचं उत्तर देऊ शकते, असं इमाम म्हणाला. यानंतर मुलीने तू हो तर म्हण, मी कोणाशीही बोलायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया दिली. याआधी इमाम उल हकने पुढचं एक-दीड वर्ष आपल्याला लग्न करण्याची इच्छा नाही, सध्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. बाबर आझमने लग्न केल्यानंतर मी लग्नाबाबत विचार करेन असं सांगितलं होतं. इमाम पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकचा भाचा आहे. 2017 साली त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इमाम उल हक याचे महिलांसोबतचे अश्लिल व्हॉट्सऍप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, यानंतर त्याला माफीही मागावी लागली होती. इमामने 14 टेस्ट, 49 वनडे आणि 2 टी-20 मॅच खेळल्या आहेत. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 855 रन आणि दोन शतकं तसंच 4 अर्धशतकं आहेत. वनडेमध्ये त्याने 9 शतकं आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 2,321 रन केले आहेत. 151 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या