सचिनच्या फरारीमध्ये बसून 18 वर्षीय मुलीने घेतला संन्यास

2002मध्ये एफ-1 रेसचा बादशाह मायकल शुमाकर यानं सचिनला 360 मॉडेना फेरारी गिफ्ट केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 07:03 PM IST

सचिनच्या फरारीमध्ये बसून 18 वर्षीय मुलीने घेतला संन्यास

सुरत, 23 जुलै : संसारिक सुख उपभोगण्यासाठी मेहनत करत असतात मात्र दुसरीकडे गुजरातमध्ये एका 18 वर्षीय मुलीनं या सगळ्या सुखांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे संन्यास घेण्यासाठी 18 वर्षीय स्तुती शाह सचिन तेंडुलकरच्या फरारीमधून बसून धर्म गुरूंकडे गेली.

सुरतमध्ये राहणाऱ्या स्तुती शाहनं वयाच्या 18व्या वर्षी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. सुरतच्या कैलास नगरमध्ये राहणार स्तुती 26 फेब्रुवारी रोजी गुरुंच्या सानिध्यात दीक्षा ग्रहण करणार आहे. सोमवारी दीक्षाची तारिख घेण्यासाठी स्तुती सचिनच्या फरारीमधून गुरुंकडे गेली होती. स्तुतीचे वडिल सुरेश शाह यांनी या सोहळ्यासाठी फरारी आणि ऑडी या दोन गाड्यांची व्यवस्था केली होती.

नुकतीच दहावी पास झालेल्या स्तुतीनं एएनआयशी बोलताना, "मला इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनयाचे होते, मात्र महाराज साहेब यांच्या संपर्कात आल्यानंतर मी सर्व मोहमायेतून संन्यास घेण्याचा विचार केला आहे", असे सांगितले.

वाचा-BCCIचं अफगाणला मोठं गिफ्ट, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार!

2002मध्ये सचिननं डॉन ब्रॅण्डमनचा रेकॉर्ड मोडल्यानंतर एफ-1 रेसचा बादशाह मायकल शुमाकर यानं गिफ्ट दिली होती. मात्र 2011मध्ये सचिननं ही गाडी जयेश शाह नावाच्या सुरतमधील एका व्यवसायिकाला विकली.

Loading...

वाचा- IND vs WI : निवड समितीच्या निर्णयावर नाराज झाला टीम इंडियाचा स्टार खेळाडू

वाचा-कोहलीनंतर आता 'हा' पुणेकर टीम इंडियाचं नवं रन मशिन!

VIDEO : पंतप्रधान मोदींचा हा खास 'मित्र' आहे तरी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...