भज्जी आणि बुमराहला 13 वर्षांच्या मुलीनं दिली टफ फाईट, पाहा हा VIRAL VIDEO

थोडा भज्जी थोडा बुमराह, पाहा या मुलीच्या भन्नाट गोलंदाजीचा व्हिडीओ.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 07:06 PM IST

भज्जी आणि बुमराहला 13 वर्षांच्या मुलीनं दिली टफ फाईट, पाहा हा VIRAL VIDEO

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आपण सर्व आपल्या आदर्श व्यक्तींच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी तत्पर असतो. अशीच एक क्रिकेटची खुप मोठी फॅन आपल्या आदर्श खेळाडूची बॉलिंग स्टाईल करताना दिसली. सर्वच स्थरातून या मुलीच्या बॉलिंगची चर्चा केली जात आहे. ही मुलगी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्या प्रसिध्द बॉलिंग स्टाईलची कॉपी करताना दिसली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलरी हरभजन सिंगची स्टाईल कॉपी करताना दिसत आहे

यावर इंटरनेट युझरनी तिचे कौतुक केले आहे. तर एका युझरनं ही हरभजन सिंगची कॉपी करतेय की जसप्रीत बुमराहची असा मजेशीर प्रश्न विचारला आहे.

Loading...

दरम्यान हरभजन सिंग आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळतो. भारतीय संघात गेल्या काही वर्षात त्याला संधी मिळाली नाही. नुकतेच भज्जीनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामना पावसामुळं रद्द झाला आणि परिणामी दोन्ही संघानं बाहेर जावे लागले. यावर भज्जीनं नाराजी व्यक्त केली होती.

हरभजननं कसोटी क्रिकेटमध्ये 417 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 विकेट घेतल्या आहेत. गेली तीन वर्ष हरभजन सिंग टीम इंडियापासून बाहेर आहे. मार्च 2016मध्ये युएईमध्ये भज्जीनं अखेरचा सामना खेळला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...