सामन्याआधी देश सोडून पाकिस्तानात गेला क्रिकेटपटू, संघ सहकारी बसले शोधत!

सामन्याआधी देश सोडून पाकिस्तानात गेला क्रिकेटपटू, संघ सहकारी बसले शोधत!

मॅच फिक्सिंगमध्ये चार खेळाडूंवर बंदीची कारवाई झाल्यानंतर यष्टीरक्षकाने देश सोडल्यानंतर या संघाला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 23 ऑक्टोबर : मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे युनायटेड अरबच्या चार खेळाडू्ंवर बंदीची कारवाई झाली आहे. त्यातच आणखी एका मोठा धक्का संघाला बसला आहे. संघाचा यष्टीरक्षक गुलाम शब्बीर संघ आणि देश सोडून पळाला आहे. तिथल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गुलाम शब्बीर यूएईतून पाकिस्तानला गेला असल्याचे समजते. त्याने देश का सोडला याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. गुलमा शब्बीर अबुधाबीत सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये खेळत होता. अचानक तो हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी पळून गेला.

गुलाम शब्बीर रविवारी शेवटचा दिसला होता. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी सोमवारी सकाळी 11 वाजता संघाच्या बैठकीला उपस्थित रहायचं होतं. पण तो बैठकीला पोहोचलाच नाही. त्यानंतर मंगळावारी को जर्सीविरुद्धच्या सामन्यालाही गुलाम उपस्थित नव्हता. यामुळे संघाला पराभव पत्करावा लागला. दरम्यान आता गुलाम शब्बीर पाकिस्तानमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.

युएईच्या संघ व्यवस्थापकांनी शब्बीरबद्दल खुलासा केला आहे. शब्बीर सोमवारी संघाच्या मिटींमध्ये आला नाही. त्यानंतर तो संघाच्या गाडीतही नव्हता. आम्हाला काळजी वाटली म्हणून त्याचे सहकारी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यानंतर शब्बीरला रुग्णालयातही शोधलं. अखेर त्याच्या घरी गेल्यानंतर शब्बीर देश सोडून पाकिस्तानमध्ये गेला असल्याचं समजलं असं संघ व्यवस्थापकांनी सांगितलं.

पाहा VIDEO : रोहितकडून अशी अपेक्षा नव्हती, विजयानंतर विराटनं केलं मोठं वक्तव्य

युएईचा संघ सध्या मॅच फिक्सिंगमुळे अडचणीत आला आहे. त्यांचे चार खेळाडू बंदीमुळे बाहेर आहेत. संघाचा सलामीवीर अशफाक अहमदला हाँगकाँगविरुद्धच्या विजयानंतर निलंबित करण्यात आलं आहे. यातच गुलाम शब्बीर देश सोडून गेल्यानं संघाला को जर्सीविरुद्ध 35 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

BCCIचं चाहत्यांना मोठं दिवाळी गिफ्ट! मैदानात सामना पाहण्यासाठी भन्नाट ऑफर

SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

Published by: Suraj Yadav
First published: October 23, 2019, 12:37 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading