गोलंदाजांची विश्वविक्रमी धुलाई! 40 षटकांत एकट्याने 585 धावा काढून रचला इतिहास

गोलंदाजांची विश्वविक्रमी धुलाई! 40 षटकांत एकट्याने 585 धावा काढून रचला इतिहास

पहिल्या गड्यासाठी 527 धावांची भागिदारी केली. यात त्याच्या सहकारी खेळाडूच्या फक्त 48 धावा होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 डिसेंबर : क्रिकेटमध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतात. पण या विक्रमांच्याही पलिकडे काही अचंबित करणाऱ्या गोष्टी घडत असतात. एका फलंदाजाने 167 चेंडूत 55 चौकार आणि 52 षटकारांच्या मदतीने 585 धावा केल्या आहेत. संघातील इतर खेळाडूंनी काढलेल्या धावांच्या दुप्पट एकट्यानेच धावा केल्या. एका शाळकरी मुलाने ही वादळी खेळी केली आहे. स्वस्तिक चिकारा असं त्याचं नाव असून त्याने माही क्रिकेट अॅकॅडमीकडून खेळताना गोरखपुरच्या एसई क्रिकेट अॅकॅडमीविरुद्ध ही खेळी केली. या खेळीच्या जोरावर माहि क्रिकेट अॅकॅडमीने एसीई क्रिकेट अॅकॅडमीला 355 धावांनी पराभूत केलं.

गाझियाबादच्या दीवान क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात एसीई क्रिकेट अॅकॅडमीने नाणेफेक जिंकून माही अॅकॅडमीला फलंदाजीला निमंत्रण दिलं. यानंतर स्वास्तिकने धुमाकूळ घातला. त्याने प्रीतसोबत पहिल्या गड्यासाठी 527 धावांची भागिदारी केली. यात प्रीतच्या 48 धावा होत्या.

स्वास्तिकच्या 585 धावांच्या जोरावर संघाने 38.2 षटकांत 704 धावांचा डोंगर उभा केला. एसीईचा गोलंदाज सोनूने 77 धावांत 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसीईने 40 षटकांत 349 धावांपर्यंत मजल मारली.

आतापर्यंत स्वास्तिकच्या नावावर सर्वाधिक 356 धावांची नोंद होती. त्याने आतापर्यंत 22 द्विशतकं आणि 7 त्रिशतकं केली आहेत. पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने सुरुवात केली ते शेवटपर्यंत गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. गाझियाबादमधील टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही.

क्लब क्रिकेटमध्ये स्वास्तिकने विक्रम रचला आहे.  त्याने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शेन डेड्सवेलच्या नावावर होता. त्याने 490 धावा करून विक्रम नोंदवला होता. आता हा विक्रम स्वास्तिकने मोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Dec 7, 2019 12:40 PM IST

ताज्या बातम्या