बेंगळुरू, 05 मार्च : कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात चेन्नास्वामी स्टेडियमवर सामना सुरू आहे. आपल्या पहिल्या विजयासाठी आरसीबीचा संघ मैदानात उतरला आहे. यात कर्णधार विराट कोहलीने सुरूवातीपासून आक्रमक फटकेबाजी केली.
यंदाच्या हंगामात एकही सामना न जिंकलेल्या आरसीबीला या सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून गुणतक्त्यात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. पहिल्याच षटकात कोहलीने मारलेल्या एका शॉटचे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी कौतुक केले.
"In Mr. Gavaskar's words - Kohli's all format shot " https://t.co/4NcAPaWQBz
— Suraj Yadav (@imyadavsuraj) April 5, 2019
सुनिल गावस्कर म्हणाले की, कोहलीचा हा शॉट टी20 प्रकारातला नाही. क्रिकेटच्या सर्वच प्रकारातला हा शॉट आहे. अत्यंत सुरेख असा हा शॉट असल्याचं गावस्कर समालोचन करताना म्हणाले. डावाच्या पहिल्याच षटकात कोहलीने प्रसिद्ध कृष्णाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारला होता.
VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले