World Cup : संघ निवडताना कोहलीनं हा विचार केला का? गावसकर भडकले

विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांची निवड योग्य आहे, पण....

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 06:41 PM IST

World Cup : संघ निवडताना कोहलीनं हा विचार केला का? गावसकर भडकले

मुंबई, 16 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतानं सोमवारी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. दरम्यान यात दिनेश कार्तिक, विजय शंकर यांच्या नावानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला असला तरी, ऋषभ पंतला 15 खेळाडूंच्या संघात वगळण्यात आल्यानं चाहत्यांनी आणि खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याचा वारसदार मानला जाणारा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला संघ न घेतल्यामुळं भारतीय संघाचं नुकसान होणार आहे, असं मत महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकच्या निवडीबाबात गावसकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. पण पंतला वगळल्याचे मला आश्चर्य वाटत आहे, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केली.

वाचा- World Cup : ...म्हणून ऋषभ पंतला वर्ल्ड कप संघात स्थान नाही

दरम्यान पंतची बाजू घेत, ‘‘पंतनं गेल्या काही महिन्यांत दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्यानं चांगली फलंदाजी केली. तसंच, शिखर धवनव्यतिरिक्त एकही डावखुरा फलंदाज पहिल्या सहा खेळाडूंत नसल्यामुळे पंतचा समावेश करणे उपयुक्त ठरलं असतं. हा विचार निवड समितीनं केला का?’’, असा सवालही गावसकर यांनी व्यक्त केलं.

तर, त्यांनी कार्तिकच्या निवडीचीही पाठराखण केली. त्यांच्या मते, “समजा, विश्वचषकात महेंद्रसिंह धोनीला माघार घ्यावी लागली तर, अशा परिस्थितीत तुम्हाला अनुभवी यष्टीरक्षकाची गरज भासू शकते. कार्तिक यासाठी जास्त उत्तम आहे.’’ असं ते म्हणाले.

वाचा- World Cup : ‘या’ खेळाडूला डावलण्याचा निर्णय विराट कोहलीला भोवणार ?

तर, संजय मांजरेकर, आकाश चोप्रा यांनीही आश्चर्य व्यक्त केलं तर, मिशेल वॉ यानं तर, निवड समितीवर टीका केली आहे.तर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानं रिषभ पंतला संघात स्थान मिळेल अशी असं वाटतं होतं, असं मत व्यक्त केलं.
2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.


VIDEO: राज ठाकरेंनी 'हे' सिद्ध केलं तर मी राजीनामा देईन: गिरीश महाजन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close