Video- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा

Video- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा

२४ तासात हा व्हिडिओ ६५ हजारपेक्षा जास्तवेळा पाहण्यात आला असून ११ हजार लोकांनी व्हिडिओला लाइक केले

  • Share this:

नवी दिल्ली, २३ जुलैः भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना यो- यो परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. आता कर्णधार विराट कोहलीसोबतच अनेक खेळाडू फिटनेसकडे लक्ष देत आहेत. या सगळ्यात यो- यो परीक्षेला दिले गेलेले महत्त्व अयोग्य असल्याचे काही माजी खेळाडूंचे म्हणणे आहे. पण मॅनेजमेण्टने त्यांचा निर्णय बदलला नाही. दरम्यान, गौतम गंभीरची मोठी मुलगी, आजीनाने यो- यो परीक्षा दिली. ट्विटरवर गंभीरने मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती यो- यो परीक्षा देताना दिसत आहे. गंभीरने या व्हिडिओवर सचिन तंडुलकर, हरभजन सिंग, युवराज सिंग यांना टॅग करत त्यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली आहे.

गंभीरच्या चाहत्यांना आजीनाचा हा व्हिडिओ फार आवडला. व्हिडिओ शेअर करताच अनेकांनी मोठ्या प्रमाणात शेअर आणि कमेंट करायला सुरुवात केली. २४ तासात हा व्हिडिओ ६५ हजारपेक्षा जास्तवेळा पाहण्यात आला असून ११ हजार लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे. काही युझर्सने आजीनाचे कौतुक केले तर काहींनी यो- यो परीक्षा सक्तीची केल्याबद्दल मस्करीही केली. सन्नी नावाच्या युझरने लिहिले की, 'यो- यो परीक्षा म्हणजे एक मस्करीच आहे. हे कोहलीचं राजकारण आहे.' तर विवेक नावाच्या व्यक्तीने लिहिले की, 'ती (आजीना) रोहित शर्मापेक्षा जास्त धावा करत आहे.'

काय आहे ही यो- यो परीक्षा-

यो- यो परीक्षा ही एकप्रकारची फिटनेस जाणून घेणारी परीक्षा असते. क्रिकेटशिवाय फुटबॉल, रग्बी या खेळातील खेळाडूंना ही परीक्षा द्यावी लागते. यात २०- २० मीटरच्या अंतरावर दोन रेषा आखून कोन ठेवले जातात. रेषेच्या एका टोकाला खेळाडूला उभं राहून कमीत कमी वेळेत ही परीक्षा पास करायची असते. या परीक्षेचा मुख्य हेतू खेळाडूचा स्टॅमिना पाहणं हा असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 02:39 PM IST

ताज्या बातम्या