Elec-widget

सचिननंतर आता 'या' दिग्गज खेळाडूची जर्सी होणार रिटायर! गंभीरनं BCCIकडे केली मागणी

सचिननंतर आता 'या' दिग्गज खेळाडूची जर्सी होणार रिटायर! गंभीरनं BCCIकडे केली मागणी

भारताला टी-20 आणि एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची जर्सी होणार रिटायर.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीरनं एक वेगळीच शिफारस बीसीसीआयकडे केली आहे. गंभीरनं बीसीसीआयकडे सिक्सर किंग युवराज सिंगची जर्सी क्रमांक 12 निवृत्त होणार आहे. गंभीरच्या मते युवराजला असा सन्मान मिळणे हा त्याचा हक्क आहे, असे सांगितले. याआधी बीसीसीआयच्या वतीनं सचिन तेंडुलकरची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त केली होती.

एखादा खेळाडू निवृत्त झाल्यानंतर क्रिकेट बोर्ड त्या खेळाडूची जर्सी निवृत्त करते. याचा अर्थ कोणताही खेळाडू या क्रमांकाची जर्सी वापरू शकत नाही. त्यामुळं जर्सी निवृत्त करणे, हा खेळाडूंचा सन्मान मानला जातो.

‘बीसीसीआयनं युवराजची जर्सी करावी रिटायर’

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गंभीनं, “सप्टेंबर महिना माझ्यासाठी खास आहे. याच महिन्यात 2007मध्ये भारतानं टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगची खेळी अप्रतिम होती. 2011मध्येही भारतानं जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगचा वाटा मोलाचा होता. त्यामुळं बीसीसीआयकडे मी मागणी करेन की त्याची 12 क्रमांकाची जर्सी रिटायर करण्यात यावी”, असे सांगितले.

वाचा-रोहित शर्मा 9 धावांवर झाला बाद, तरी केली धोनीची बरोबरी!

Loading...

2007च्या टी-20 वर्ल्ड कपचा युवी झाला होता हिरो

गौतम गंभीरनं आपल्या लेखात, युवराज सिंगनं 2007च्या टी-20 वर्ल्ड कप आक्रमक फलंदाजी केली होती. 5 सामन्यात युवीनं 148 धावा केल्या होत्या. त्यानं तब्बल 195च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली होती. यात इंग्लंडमध्ये युवीनं 6 चेंडूत मारलेले 6 सिक्स कोणीच विसरू शकलेले नाही. यानंतर 24 सप्टेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानला नमवत पहिला टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता”, असे सांगितले.

वाचा-फलंदाजाचा जीवघेणा शॉट; थोडक्यात वाचला गोलंदाज, पाहा खतरनाक VIDEO

10 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 साली पदार्पण करणाऱ्या युवीनं 10 जून 2019ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जून 2017नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. युवराजकडे 304 एकदिवसीय सामने, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई संघाकडून खेळणाऱ्या युवराज सिंगला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.

वाचा-धोनीच्या निर्णयामुळं चाहत्यांना बसला शॉक, म्हणाला...

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...