गौतम गंभीर फुकटात वाटतोय Fabiflu, पण ट्रोलर्सनी साधला निशाणा, कारण...

गौतम गंभीर फुकटात वाटतोय Fabiflu, पण ट्रोलर्सनी साधला निशाणा, कारण...

दिल्लीतल्या कोरोनाच्या (Corona Virus) वाढत्या संक्रमणामुळे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) नागरिकांची मदत करण्यासाठी पुढे आला आहे. भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीरने फॅबीफ्लू (Fabiflu) हे औषध फुकट वाटण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : दिल्लीतल्या कोरोनाच्या (Corona Virus) वाढत्या संक्रमणामुळे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) नागरिकांची मदत करण्यासाठी पुढे आला आहे. भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीरने फॅबीफ्लू (Fabiflu) हे औषध फुकट वाटण्याची घोषणा केली आहे. पूर्व दिल्लीचे नागरिक माझं कार्यालय 2, जागृती एनक्लेव्ह मधून फॅबिफ्लू घेऊन जाऊ शकतात, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. गौतम गंभीरच्या या घोषणेनंतर अनेकांनी त्याच कौतुक केलं, पण काहींनी त्याला ट्रोलही केलं.

गौतम गंभीर बुधवारी ट्वीट करत म्हणाला, 'पूर्व दिल्लीचे नागरिक फॅबिफ्लूचं औषध माझं कार्यालय 2, जागृती एनक्लेव्हमधून 10 ते 5 या वेळेत आधार कार्ड आणि डॉक्टरांच्या प्रिसक्रिप्शनसोबत असेल तर फुकटात घेऊ शकतात.' या ट्वीटनंतर काही तासांमध्येच गंभीरने दुसरं ट्वीट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावरही निशाणा साधला. 'नो व्हिजन, नो डायरक्शन, दिल्ली मरत आहे. थोडी तरी लाज असेल, तर राजीनामा द्या,' अशी टीका गंभीरने केली.

गौतम गंभीरच्या ट्वीटवर अनेकांनी त्याचं कौतुक केलं. 'संकटाच्या काळात गरजूंना बेड, प्लाझ्मा, ऑक्सिजन, औषधांची व्यवस्था गंभीर करत आहे,' असं ट्वीट एकाने केलं.

फुकट औषध वाटण्यावरून त्याच्यावर बरेच जणांनी निशाणा साधला. गौतम गंभीर मला क्रिकेटपटू म्हणून आवडतो, पण राजकारणात आल्यावर त्याने स्वत:चा आत्मसन्मान विकून टाकला. स्वत: आयपीएलमध्ये आहे आणि दिल्लीच्या गोष्टी करतोय, अशी टीका एका यूजरने केली.

दुसऱ्या यूजरने गंभीरचे एक वर्ष जुनं ट्वीट आणि सध्याचं ट्वीट एकत्र करून कमेंट केली. जेव्हा कोरोना रुग्ण कमी होते, तेव्हा गंभीर केंद्रीय मंत्र्यांना भेटून आपण करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत होता, पण आता कोरोना रुग्ण वाढत असताना तो अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा मागत आहे, अशी टीका या यूजरने केली.

Published by: Shreyas
First published: April 22, 2021, 7:43 PM IST

ताज्या बातम्या