S M L

सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर उचलणार

गौतम गंभीरच्या या निर्णयाचं भरभरून कौतुक होतंय.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 28, 2017 03:09 PM IST

सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर उचलणार

28 एप्रिल :  छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या मुलांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी टीम इंडियाचा शिलेदार आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरनं स्वीकारली आहे. गौतम गंभीरच्या या निर्णयाचं भरभरून कौतुक होतंय.

छत्तीसगडमधील सुकमामध्ये सोमवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 74 बटालियनच्या 25 सीआरपीफ जवान शहीत झाले तर 6 जण जखमी झाले आहेत.

या 25 शहिदांच्या मुलांचा सगळा खर्च उचलण्याचं गंभीरनं ठरवलं आहे. त्याच्या मीडिया मॅनेजरनं या वृत्ताला दुजोरा दिला.


दरम्यान, केंद्रीफ शहरविकास आणि गृहनिर्मा मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी गौतम गंभीरच्या निर्णयाचे कौतुक केलं आहे. ‘शहीद जवानांच्याह मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून गौतम गंभीरने नवा आदर्श समाजापुढे ठेवला. प्रेरणादायी , असं ट्विट नायडू यांनी केलं आहे.

दरम्यान, सुकमा हल्ल्यानंतर झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सची टीम हाताला काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 02:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close