Kashmir : 'अखेर काश्मीरमध्ये आपण तिरंगा फडकवला', Article370 रद्द केल्याबद्दल 'हे' खेळाडू सरकारवर खुश!

Article 370 scrapped : केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतलं 370वं कलम हटवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 05:03 PM IST

Kashmir : 'अखेर काश्मीरमध्ये आपण तिरंगा फडकवला', Article370 रद्द केल्याबद्दल 'हे' खेळाडू सरकारवर खुश!

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतलं 370वं कलम हटवलं आहे. राज्याच्या इतिहासातला हा सर्वात मोठा निर्णय समजला जातोय. हा निर्णय घेतानाच केंद्राने आणखी दोन मोठे निर्णय घेतली. लद्दाख या पहाडी क्षेत्राला जम्मू आणि काश्मीरपासून वेगळं करत केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलाय. तर जम्मू आणि काश्मीर हे दिल्ली प्रमाणं विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलाम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

या प्रस्तावाला लोकसभेत मंजूरी मिळाल्यानंतर सर्व देशात जल्लोषाचे वातावरण आहे. या निर्णयाचे भारताच्या माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटपटूंनीही स्वागत केले. खासदार गौतम गंभीर यांनी, सरकारच्या 370कलम हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, "जे कोणीच करू शकलं नाही ते आपण करून दाखवलं. काश्मीरमध्ये आपण तिरंगा फडकवला. जय हिंद काश्मीर मुबारक!", असे ट्वीट केले.

वाचा-असं आहे PoK : पाकिस्तान ज्याला 'आझाद काश्मीर' म्हणतं ते आहे इतकं सुंदर!

तसेच, सुरेश रैनाने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत, "कलम 370 हटवण्याचा निर्णय हा मोठा आहे. आता फक्त कश्मीरमध्ये चांगला काळ येऊ देत, अशी मी आशा करता", असे ट्वीट केले.

वाचा-जम्मू आणि काश्मीरमध्ये आता होतील हे 10 मोठे बदल, 70 वर्षातला मोठा निर्णय

तर, माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनं केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. कैफनं, "मी आशा करतो की या निर्णयामुळं शांती आणि प्रेम भावना वाढेल", असे सांगितले.

ऑलिम्पिक माजी खेळाडू आणि माजी खासदार राजवर्धन सिंह राठोड यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत, काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी ही खुप मोठी श्रध्दांजली आहे", असे ट्वीट केले.

वाचा-PHOTO : काश्मीरच्या निर्णयाबदद्ल फाडले कपडे तर दुसरीकडे जल्लोष

दरम्यान, घटनेतलं हे कलम हटविणं हा जनसंघापासून भाजपचा अजेंडा होता. त्यामुळे आता गेली अनेक वर्ष दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचा दावा भाजप करणार आहे. स्वातंत्र्यानंतर 370 कलम काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं होतं. राज्याला देण्यात आलेल्या विशेष अधिकारामुळं राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचाही अधिकार नव्हता. देशात आर्थिक आणीबाणी लागू केली तरी ती काश्मीरमध्ये मात्र लागू होत नव्हती . भारतातील इतर राज्यांत लागू झालेले कायदेही इथं लागू करता येत नव्हते. आता हे सगळच बदलणार आहे.

वाचा-Article370 रद्द केल्याच्या आनंदात गिरीष महाजन नाचू लागले, पाहा VIDEO

कलम 370 हटवल्यानंतर काय होणार? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...