पंतला मार्गदर्शनासाठी धोनी एकटाच नाही, गंभीरने सुचवला नवा पर्याय

पंतला मार्गदर्शनासाठी धोनी एकटाच नाही, गंभीरने सुचवला नवा पर्याय

ऋषभ पंतच्या खेळीवरून आणि त्याला पर्यायी व्यवस्था तयार करत असल्याचं निवड समितीने म्हटलं होतं. यावर गंभीरने परखड मत व्यक्त करत खेळाडूंना समजून घेण्याची ही पद्धत नाही असं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना रविवारी होत आहे. या सामन्यात तरी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत जबाबदार खेळी करणार का याची चर्चा सुरू आहे. पंत यष्टीरक्षणात चुका करत नसला तरीही त्याला फलंदाजीत मात्र म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने याआधीच पंतला इशारा देताना म्हटलं होतं की, त्याला खूप संधी मिळाल्या आहेत. आता संजू सॅमसनला संधी द्यायला हवी. यानंतर आता पुन्हा एकदा गंभीरने त्याच्या लेखातून पंतच्या खेळीवरून बीसीसीआयला सल्ला दिला आहे.

भारताकडे दिग्गज क्रिकेटपटूंची कमी नाही. युवराज, हरभजन, व्हीव्हीएस लक्ष्मण, सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे यांच्यासारखे दिग्गज आहेत. भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा उपयोग मी केला असता असं गंभीरने म्हटलं आहे. भारताच्या गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी कुंबळे आणि हरभजन यांच्यापेक्षा चांगलं कोण असू शकतं. चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना हे दोघेही घडवू शकतात असं गंभीर म्हणाला.

पंत सध्या त्याच्या बेजबाबदार फटकेबाजीमुळे टीकेचा धनी होत आहे. निवड समितीने भारताचा दिग्गज यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनंतर पंतच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन मालिकांमध्ये पंतने यष्टीरक्षणात बऱ्यापैकी कामगिरी केली असली तर फलंदाजीत त्याला यश मिळालेलं नाही. निवड समितीने धोनी पंतला टी20 वर्ल्ड कपसाठी मदत करेल असं म्हटलं होतं. मात्र, गौतम गंभीरने पंतला युवराज सिंग मेंटर का नाही होऊ शकत असा प्रश्न विचारला आहे.

युवराज सिंग सहजपणे ऋषभ पंतला सावध खेळ कसा करायचा आणि त्याचं महत्व समजावून सांगू शकतो असं गंभीरने म्हटलं आहे. नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या किंवा इतर खेळाडूंबद्दल बोलण्यात रस नाही असं म्हणत गंभीरने धोनीबद्दल बोलणं टाळलं. तसेच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पंतपेक्षा संजू सॅमसन नक्कीच उजवा ठरतो याचा पुनरुच्चार गंभीरने केला. मात्र, संघ व्यवस्थापन पंतसाठी बेधडक ऐवजी बेजबाबदार आणि सॅमसनसाठी बॅकअप अशा शब्दांचा वापर करत आहे. एका युवा खेळाडूला समजून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही अशा शब्दांत गंभीरने बीसीसीआयला सुनावलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन बाहेर पडल्यानंतर पंतला संघात स्थान मिळाले, मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पंतनं 4 सामन्यात 29च्या सरासरीनं 116 धावा केल्या. तर वेस्ट इंडिज दौऱ्यात 2 एकदिवसीय सामन्यात केवळ 20 धावा केल्या. खराब शॉटमुळं पंतवर अनेक दिग्गज खेळाडूंनी टीकाही केली. त्यामुळं त्याला संघात जागा देण्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आक्रमक फलंदाज म्हणून पंतची ओळख असली तरी, सामना जिंकून देण्यासाठी त्यानं चांगली कामगिरी अद्याप केलेली नाही. तरी त्याला दक्षिण आफ्रिका विरोधात संघात स्थान देण्यात आले आहे.

SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ!

Published by: Suraj Yadav
First published: September 22, 2019, 8:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading