'त्याचा काळ आता संपलाय', धोनीला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची कठोर भूमिका

'त्याचा काळ आता संपलाय', धोनीला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची कठोर भूमिका

रविवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. यावेळी धोनीबाबत निवड समिती निर्णय घेणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये भारतीय संघानं सामना गमावल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान याबाबत धोनी किंवा बीसीसीआयनं भाष्य केलेले नाही. भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यामुळं भारतीय संघाची निवड करताना धोनीच्या निवृत्तीवर चर्चा केली जाणार आहे. रविवारी निवड समिती भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्यामुळं रविवारी धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार की नाही, तसेच निवृत्ती संदर्भात निर्णय होणार आहे.

दरम्यान, चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागणार आहे. याबद्दल भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं बीसीसीआय आणि निवड समितीला सल्ला दिला आहे. गंभीरनं, "धोनीबाबत निर्णय घेताना भावूक होण्याची गरज नाही. त्याचा काळ संपला आहे, निवड समितीनं संघाच्या भविष्याचा विचार केला पाहिजे", असे मत व्यक्त केले.

गौतम गंभीरनं एका कार्यक्रमा बोलताना, "भविष्याचा विचार करणे ही सध्या गरज आहे. धोनी जेव्हा कर्णधार होता, तेव्हा त्याने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला होता. मला आठवते 2012मध्ये धोनीला ऑस्ट्रेलियाविरोधात सचिन, मी आणि सेहवाग एकत्र नको होतो. कारण मैदान खूप मोठे होते. त्यामुळं आता भावूक होऊन विचार करण्याची वेळ नाही", असे मत व्यक्त केले.

वाचा- धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो; गंभीरचा खळबळजनक खुलासा

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

वाचा- IND vs WI : वेस्ट इंडिज दौरा नाही सोपा, भारताचा 'हा' अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर

असा असेल वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल. या दौऱ्यासाठी 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. तर शिखर धवन देखील उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळू शकते.

वाचा- क्रिकेटच्या नियमांमध्ये ICCने केले दोन मोठे बदल; निकालावर होणार परिणाम!

वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO

First Published: Jul 19, 2019 06:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading