लंकेच्या खेळाडूंसाठी पाकने लावला कर्फ्यू, गंभीरने शेअर केला मजेदार VIDEO

2009 ला दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही लंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. लंकेच्या संघाला कडक सुरक्षा पाकिस्तानने पुरवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 10:28 AM IST

लंकेच्या खेळाडूंसाठी पाकने लावला कर्फ्यू, गंभीरने शेअर केला मजेदार VIDEO

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : दहा वर्षांपूर्वी झालेला दहशतवादी हल्ला विसरून लंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर बंदी घातली होती. त्यांचे होम ग्राउंड दुबई करण्यात आलं होतं. पण पाकिस्तानने सुरक्षेची हमी दिल्यानंतर लंकेच्या संघाने पाकिस्तान दौरा करण्यास तयारी दर्शवली होती. पाकिस्तानने लंकेच्या संघाला कडक सुरक्षा पुरवली असली तरी त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लंकेच्या संघाला देण्यात आलेल्या सुरक्षेची परिस्थिती दिसत आहे. या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येत आहे की, कराचीमध्ये संचारबंदी लागू करून सामना खेळवला जात आहे. गंभीरने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, एवढं काश्मीर काश्मीर केलं की कराची विसरून गेले.

कराचीमध्ये सामन्यापूर्वी लंकेचा संघ कडक सुरक्षा व्यवस्थेत स्टेडियममध्ये पोहचला. त्यापूर्वी रस्त्यावरून जात असताना कारमध्ये बसलेल्या व्यक्तीनं व्हिडिओ शूट केला आहे. लंकेच्या संघाला देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रत्येकजण हैराण होता. रस्त्यावर फक्त संघाच्या गाड्या आणि त्यांच्या मागे पुढे सुरक्षा रक्षकांच्या गाड्यांचा ताफा दिसत होता.

कडक सुरक्षा पुरवल्यानंतरही पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षेच्या ताफ्यात अॅम्ब्युलन्सदेखील आहे. यावर व्हिडिओ शूट करणारा म्हणतो की, इतकी सुरक्षा असतानाही काही झालं तर अॅम्ब्युलन्सची सोय आहे. म्हणजेच कडक सुरक्षा असूनही हल्ल्याचा धोका वाटतो असं म्हणत गाडीतील तरूण हसतात.

VIDEO : उपमुख्यमंत्री कोण होणार? चंद्रकांत पाटील म्हणाले...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...