गंभीरने धुतले मुलींचे पाय, पत्नीला विचारला 'हा' प्रश्न

गंभीरने धुतले मुलींचे पाय, पत्नीला विचारला 'हा' प्रश्न

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने अष्टमीला मुलींचे पाय धुतले. त्यावेळचा फोटो शेअर करताना गंभीरने या कामाचे बिल कोणाकडे पाठवू असा प्रश्न विचारला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्यानं आतापर्यंत अनेक मुद्यांवर त्याचं मत मांडलं आहे. गंभीरने त्याच्या दोन लहान मुलींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये गंभीर मुलींचे पाय धुताना दिसत आहे.

गंभीरने त्याच्या घरी दुर्गाअष्टमीनिमित्त मुलींचे पाय धुतले. त्यानं यावेळेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. गंभीरने ट्विट करताना म्हटलं आहे की, अष्टमी कंजकला आशिर्वाद मिळाल्यानं दोन मुलींचा बाप म्हणून मी त्यांची काळजी घेण्याच्या कलेत प्राविण्य मिळवत आहे. माझ्या या कामाचे बिल कोणाकडे पाठवलं पाहिजे असा प्रश्न त्यानं पत्नीला टॅग करून विचारला आहे. गंभीरचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.

दोनच दिवसांपूर्वी गंभीरचे नाव चर्चेत आले होते. पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद इरफानने दावा केला होता की गंभीरची क्रिकेट कारकिर्दी त्यानं उद्ध्वस्त केली. मोहम्मद इरफानने एका वाहिनीशी चर्चा करताना सांगितलं की, 2012 च्या भारत-पाक मालिकेवेळी गंभीर त्याच्याविरुद्ध खेळायला भीत होता. त्यानंतर गंभीरची कारकिर्द संपुष्टात आली. गंभीरने त्या मालिकेनंतर फक्त एक एकदिवसीय मालिका खेळली. त्यानंतर गंभीरला संघातून बाहेर बसावं लागलं.

जेव्हा मी भारताविरुद्ध खेळलो तेव्हा गौतम गंभीर माझ्यासमोर टिकू शकला नाही. 2012 मध्ये माझ्या उंचीमुळे माझ्या चेंडूचा अंदाज त्याला येत नव्हता. यामुळेच गंभीरची कारकिर्दी उद्ध्वस्त झाल्याचा दावा इरफानने केला आहे. तो म्हणाला की, गंभीर माझ्या उंचीमुळे फलंदाजी करायला भीत होता. मला नेहमीचं वाटायचं की तो माझ्याशी डोळे भिडवण्यापासून लपत होता.

वाचा : जहीरला शुभेच्छा देतानाची फिरकी पांड्याला महागात, चाहत्यांनी घेतलं फैलावर

वाचा : टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: October 8, 2019, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading