धोनी-रोहितमुळे विराटची चलती, गंभीरची बोचरी टीका

धोनी-रोहितमुळे विराटची चलती, गंभीरची बोचरी टीका

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराट कोहली यशस्वी कर्णधार असून त्याला अजुन खूप काही करायचं आहे असं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने गुरुवारी भारताचा कर्णधार विराट कोहलीवर बोचरी टीका केली आहे. गंभीरने म्हटलं की, विराट भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार आहे कारण त्याच्याकडं महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासारखे खेळाडू आहेत. त्याची खरी कसोटी तेव्हा असते जेव्हा तो आयपीएलमध्ये एखाद्या संघाचं नेतृत्व करतो.

गंभीरने एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटलं की, विराटला अजुन खूप पुढं जायचं आहे. वर्ल्ड कपमध्ये विराट चांगला खेळला पण त्याला खूप काही करायचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो चांगलं नेतृत्व करतो कारण त्याच्याकडं रोहित आणि धोनी आहेत. नेतृत्वाचा कस तेव्हा लागतो जेव्हा आयपीएलमध्ये एखाद्या संघाचं नेतृत्व करता. त्यावेळी तुमच्याकडे मोठे खेळाडू नसतात.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी किंवा महेंद्र सिंग धोनीने चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना संघांची कामगिरी बघा. त्यांनी जे मिळवलं त्या तुलनेत रॉय़ल चॅलेंजर्स बेंगळुरू कुठे आहे ते दिसेल असं गंभीर म्हणाला. सध्या रोहित शर्माला कसोटी संघात संधी मिळावी का यावर बऱ्याच चर्चा होत आहेत. त्याबद्दल गंभीरने रोहित शर्माची बाजू घेतली. गंभीर म्हणाला की रोहित इतका चांगला खेळाडू आहे की तो सर्व प्रकारात फिट बसतो. तो बेंचवर बसून राहणं योग्य दिसत नाही.

वाचा : 'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

सध्या भारतीय संघात खेळाडूंच्या निवडीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्याबद्दल गंभीर म्हणाला की, केएल राहुलला जास्त संधी द्यायला हवी. जर तुम्ही संघात त्याला घेत असाल तर प्लेइंग इलेव्हनमध्येही घ्यायला हवा. त्याला 15-16 सदस्यांच्या संघात घेता आणि खेळवत नाही याला काहीच अर्थ नाही असंही गंभीर म्हणाला.

वाचा : निवड समितीनं शोधला पंतला पर्याय, तीन खेळाडूंची नावे आघाडीवर!

देशाकडून खेळताना वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. गंभीरने सांगितलं की, 2007 मध्ये वर्ल्ड कपच्या संघात स्थान पटकावता आलं नाही तेव्हा क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेताल होता. तेव्हा संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याच वर्षी टी20 वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. मला अंडर 14 आणि अंडर 19 वर्ल्डकपदेखील खेळता आला नव्हता.

वाचा : संघात विराटची हूकूमशाही? कर्णधारपदावरून हटवण्याच्या प्रश्नावर RCB ने दिलं उत्तर

'भाई पण नाही छोटाही अन् मोठाही नाही', कोल्हेंची सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या