इम्रान खान म्हणजे दहशतवाद्यांचे ‘रोल मॉडल’, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

इम्रान खान म्हणजे दहशतवाद्यांचे ‘रोल मॉडल’, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत इम्रान खान यांच्या भाषणावर सर्वत्र होत आहे टीका.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : दिल्लीचा आमदार आणि भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर नेहमीच आपल्या पाकिस्तान विरोधात भाष्यामुळं चर्चेत असतो. आता तर गंभीरनं चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. गंभीरनं आपल्या ट्वीटमध्ये, इम्रान खान हे दहशतवाद्यांचे रोल मॉडल आहेत. त्यामुळं त्यांना बहिष्कृत करावे, असे धक्कादायक विधान केले आहे. याआधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या 74व्या सत्रात इम्रान खान यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी इम्रान यांनी भारताविरोधात भाषण केले होते, त्यामुळं सर्व स्थरातून त्यांच्यावर टीका केली जात होती.

यात आता गंभीरनं इम्रान यांच्या भाषणावरून खेळ समुदयानं इम्रान यांना बहिष्कृत करावे, अशी मागणी केली आहे. गंभीर यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत इम्रान यांनी काश्मीरमधील नागरिकांवर केंद्र सरकारमुळं अत्याचार होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर इम्रान यांच्यवर जगभरातून टीका होत आहे.

गंभीरनं साधला इम्रान यांच्यावर निशाना

खासदार गौतम गंभीरनं इम्रान खान यांच्याविरोधात ट्वीट करत, “एका खेळाडूला रोल मॉडेल मानले जाते. त्याचा व्यवहार, नैतिकता, चारित्र्य पाहून त्याला हे स्थान दिले जाते. पण नुकत्याच एका माजी खेळाडूला बोलताना पाहिलं. हा खेळाडू म्हणजे दहशतवाद्यांचा रोल मॉडेल आहे. इम्रान खान यांना क्रिकेट समुदयातून बहिष्कृत केले पाहिजे”, आपल्या भावना व्यक्त केल्या.

इम्रान यांच्या भाषणात होत्या असंख्य चूका

इम्राण यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत केलेल्या भाषणात अनेक चूका केल्या. त्यांनी आपल्या भाषणात एक-दोनवेळा मोदींना राष्ट्रपती म्हणून संबोधित केले. त्यामुळं आधीच सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या इम्राननं गंभीरवर ताशोरे ओढले आहेत.

दहशतवाद्यांना पेंशन सुविधा देतात पाकिस्तान

भारताचे प्रथम सचिव यांनी जर पंतप्रधान इम्रान म्हणत आहेत की संयुक्त राष्ट्रांनी आपले अधिकारी पाठवून तपासावे की पाकमध्ये दहशतवादी आहेत की नाही. तसेच, पाकिस्तानवर गंभीर आरोप करत भारतानं या देशात दहशतवाद्यांना पेंशन दिली जाते असे सांगितले होते. भारताच्या या पलटवारानंतर पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे.

VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...

Published by: Priyanka Gawde
First published: September 30, 2019, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading