Home /News /sport /

'आफ्रिदीचं ते वक्तव्य वादग्रस्तच होतं', गंभीरने सांगितली आठवण

'आफ्रिदीचं ते वक्तव्य वादग्रस्तच होतं', गंभीरने सांगितली आठवण

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) त्यांच्या गरम डोक्यासाठी प्रसिद्ध आहेत.

    नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) त्यांच्या गरम डोक्यासाठी प्रसिद्ध आहेत. या दोघांमधली शाब्दिक चकमक 2007 सालापासून सुरू आहे. जेव्हा दोन्ही देशांमध्ये क्रिकेटच्या मैदानात मुकाबला झाला होता. शाहिद आफ्रिदी जंटलमन्स गेमचं राजकारण करतो, असा आरोप गौतम गंभीरने वारंवार केला आहे. आफ्रिदीने 2011 वर्ल्ड कपमध्येही त्याचे राजकीय रंग दाखवल्याची टीका गंभीरने केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट सुरू व्हावं का? याबाबत गौतम गंभीरला विचारण्यात आलं. त्यावेळी गंभीरने आफ्रिदीने वर्ल्ड कप 2011 साली केलेल्या वक्तव्याची आठवण गंभीरने करून दिली. धोनीच्या नेतृत्वात भारताने सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं. या मॅचविषयी बोलताना गंभीर म्हणाला, 'काश्मिरींसाठी आपल्याला टॉस जिंकायचा असल्याचं आफ्रिदीने सांगितलं होतं. हे वक्तव्य अपमानजनक होतं. आम्ही पाकिस्तानमधल्या गोष्टींवर बोलत नाही, मग त्यांनी आमच्या गोष्टींवर बोलता कामा नये. त्यांनी स्वत:च्या अडचणी सोडवाव्यात, आम्ही आमच्या सोडवू.' भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टॉसला शाहिद आफ्रिदीने राजकीय रंग दिल्याचा आरोपही गंभीरने केला. गंभीरने भारताच्या 2011 वर्ल्ड कप विजयाला 26/11 हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना समर्पित केलं होतं. आताही माझी भूमिका तीच असल्याचं गंभीरने सांगितलं. तसंच भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेट सुरू करण्याची गरज नाही. जोपर्यंत काश्मीरमधला दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट सुरू होऊ नये. मी राजकारणात नव्हतो, तेव्हाही माझी हीच भूमिका होती, अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या